Monday, July 15, 2024

अभिनयाच्या जोरावर राम कपूरने मिळवली प्रेक्षकांच्या मनात जागा, ‘या’ मालिकेने दिली खास ओळख

छोट्या पडद्यापासून ते मोठ्या पडद्यावर आपला ठसा उमटवणारे अभिनेते राम कपूर (Ram kapoor) आज आपला ४९ वा वाढदिवस साजरा करत आहेत. राम कपूर हा असाच एक अभिनेता आहे, ज्याने आपल्या अभिनयाच्या जोरावर लोकांच्या हृदयात खास स्थान निर्माण केले. 1 सप्टेंबर 1973 रोजी दिल्लीत जन्मलेले राज कपूर आता ‘कसम से’ आणि ‘बडे अच्छे लगते हैं’ सारख्या मालिकांमुळे घराघरात ओळखले जातात. आज अभिनेत्याच्या वाढदिवसानिमित्त आम्ही तुम्हाला त्याच्या आयुष्याशी संबंधित काही गोष्टी सांगणार आहोत.

राम कपूरने आतापर्यंत अनेक चित्रपट आणि टीव्ही शोमध्ये आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे. पण कॉलेजच्या दिवसातच त्याला पहिल्यांदाच अभिनयाचा अनुभव आला. जेव्हा आव्हान आणि कर्णधाराच्या आदेशानंतर, त्याने एका नाटकात भाग घेतला आणि मुख्य भूमिका केली. यानंतर त्याला अभिनयावरील प्रेम कळले. 1997 मध्ये त्यांनी ‘न्याय’ या मालिकेतून टीव्हीच्या दुनियेत प्रवेश केला. यानंतर तो ‘घर एक मंदिर’, ‘क्यूंकी सास भी कभी बहू थी’, ‘दिल की बातें दिल ही जाने’सह अनेक शोचा भाग बनला.

‘घर एक मंदिर’च्या वेळी राम कपूरची गौतमीशी भेट झाली होती. या शोमध्ये दोघांनी पती-पत्नीची भूमिका साकारली होती आणि त्यादरम्यान दोघेही प्रेमात पडले. काही काळ डेट केल्यानंतर रामने गौतमीला लग्नासाठी प्रपोज केले. यानंतर 2003 मध्ये दोघांनी लग्न केले. दोघांना एक मुलगी आणि मुलगा आहे. राम कपूरने एकदा सांगितले होते की ते सुरुवातीच्या काळात खूप धूम्रपान करायचे. मात्र मुलीच्या नकारानंतर त्यांनी ही सवय सोडली.

राम कपूरचे वजन 130 किलो होते, पण अचानक त्यांनी केलेल्या बदलाने सर्वांनाच आश्चर्यचकित केले. लवयात्री या चित्रपटात दिसल्यानंतर त्याने आपल्या फिटनेसवर काम करण्यास सुरुवात केली आणि 30 किलो वजन कमी करण्यात यश मिळवले. स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्यासाठी तो 16 तास वर्कआउटसह काहीही खात नव्हता. सकाळी उठून तो तासभर वेटलिफ्टिंग करायचा आणि मग रात्री कार्डिओही करायचा.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-
ना राणी, ना आम्रपाली, ‘ही’ आहे भोजपुरीतील महागडी अभिनेत्री, रातोरात मानधन डबल केल्याने आली चर्चेत
शाहरुखचा रागराग करायचा ‘हा’ डायरेक्टर, पण बायको अन् सासरवाडीच्या लोकांची काळजी घेताना पाहून बदलले मत
‘भारतीय आई-वडील तुम्हाला मारून टाकतील…’, प्रसिद्ध अभिनेत्रीवर वीर दासने साधला निशाणा

हे देखील वाचा