Monday, July 15, 2024

ना राणी, ना आम्रपाली, ‘ही’ आहे भोजपुरीतील महागडी अभिनेत्री, रातोरात मानधन डबल केल्याने आली चर्चेत

भारतातील आघाडीच्या सिनेइंडस्ट्रीप्रमाणे आता भोजपुरी सिनेइंडस्ट्रीही हळूहळू आपली खास ओळख बनवत आहे. फक्त यूपी आणि बिहारपर्यंत मर्यादित राहणारे भोजपुरी सिनेमे आणि त्यात काम करणाऱ्या कलाकारांनी आता संपूर्ण जगभरात आपली ओळख बनवली आहे. यातील कलाकार सोशल मीडियापासून ते छोट्या पडद्यावरील ‘बिग बॉस‘ शोपर्यंत आपला जलवा दाखवत आहेत. म्हणजेच काय तर आता भोजपुरी सिनेइंडस्ट्रीला आता चांगले दिवस आले आहेत. भोजपुरी सिनेमे ज्याप्रकारे कमाई करत आहेत, त्याप्रकारे यातील कलाकारांनीही त्यांच्या मानधनात वाढ केली आहे. चला तर जाणून घेऊया भोजपुरीतील महागड्या अभिनेत्रीबद्दल.

सध्या भोजपुरी सिनेइंडस्ट्रीत सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रीबद्दल बोलायचं झालं, तर त्यात आम्रपाली दुबे आणि राणी चॅटर्जी नाही, तर भलत्याच अभिनेत्रीचे नाव समोर येत आहे. कोण आहे ती अभिनेत्री, चला जाणून घेऊया…

आम्रपाली आणि राणी वर्षोनुवर्षे करतायत धमाल
आम्रपाली दुबे (Aamrapali Dubey) हिला भोजपुरी इंडस्ट्रीत काम करून आता जवळपास 15 वर्षांहून अधिक काळ झाला आहे. तसेच, राणी चॅटर्जी (Rani Chatterjee) ही 15 वर्षांहून अधिक काळ भोजपुरी सिनेमांची राणी बनली आहे. या दोघींनीही भोजपुरी सिनेमातील जवळपास प्रत्येक सुपरहिट अभिनेत्यासोबत काम केले आहे. मात्र, या दोघीही प्रत्येक प्रोजेक्टसाठी 20 ते 25 लाख रुपये मानधन घेतात. तसेच, इंडस्ट्रीतील सर्वात महागड्या अभिनेत्रीही राहिल्या आहेत. मात्र, आता एका अभिनेत्रीने सर्वाधिक मानधन घेण्याचा मान पटकावत यांना मागे टाकले आहे. एकाच रात्रीत आपले मानधन दुप्पट करत एक अभिनेत्री भोजपुरी इंडस्ट्रीतील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री बनली आहे. ही अभिनेत्री इतर कुणी नसून अक्षरा सिंग (Akshara Singh) आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshara Singh (@singhakshara)

अक्षरा सिंग हिने वाढवले तिचे मानधन
अक्षरा सिंग हिने काही दिवसांपूर्वीच तिचे मानधन दुप्पट केले आहे. आधी ती एका सिनेमासाठी 15 ते 20 लाख रुपये मानधन घ्यायची. मात्र, आता ती 30 ते 40 लाख रुपये घेते. त्यामुळे ती आतापर्यंतची सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री बनली आहे. तिने ‘बिग बॉस ओटीटी’मध्ये काम केल्यानंतर तिच्या प्रसिद्धीत चांगलीच वाढ झाली आहे. अक्षरा हिचा सोशल मीडियावरही चांगलाच वावर असतो. तिला इंस्टाग्रामवर 48 लाखपेक्षा जास्त चाहते फॉलो करतात.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
शाहरुखचा रागराग करायचा ‘हा’ डायरेक्टर, पण बायको अन् सासरवाडीच्या लोकांची काळजी घेताना पाहून बदलले मत
अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस पुरती फसली, जेलमध्ये जाण्याची शक्यता
वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या रणवीरचे खळबळजनक वक्तव्य; म्हणाला, ‘कॅटरिना आणि दीपिका औकातीच्या बाहेरच्या’

हे देखील वाचा