नेहमीच टेलिव्हिजन आणि चित्रपट या दोन माध्यमांमध्ये कोण जास्त प्रसिद्ध आणि लोकप्रिय यावर चर्चा होते. दोन्ही माध्यमांच्या चांगल्या वाईट अशा बाजू आहेत. आज अनेक टेलिव्हिजन वरील सुपरहिट कलाकार मोठा पडदा गाजवताना दिसत आहे. टेलिव्हिजनवरील सुपरहिट चेहरा असणारा अभिनेता म्हणजे राम कपूर. टेलिव्हिजन इंडस्ट्रीतले मोठे नाव आणि आता चित्रपटांमधील प्रसिद्ध लोकप्रिय अभिनेते म्हणून राम कपूर ओळखले जातात. आज राम कपूर त्यांचा ४८ वा वाढदिवस साजरा करत आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्यांच्याबद्दल अधिक माहिती.
राम कपूर यांचा जन्म १ सप्टेंबर १९७३ रोजी पंजाबमध्ये झाला. राम कपूर यांना शालेय जीवनातच समजले होते की, ते अभिनीत करियर करू इच्छिता. तसेच त्यांनी केले. १९९७ साली ‘न्याय’ या टीव्ही मालिकेतून राम कपूर यांनी अभिनय जगतात पदार्पण केले. त्यानंतर त्यांनी घर एक मंदीर, कभी आए ना जुदाई, रिश्ते, कसम से यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले. त्यांना खरी लोकप्रियता मिळाली ती ‘कसम से’ मालिकेतून. तर ‘बडे अच्छे लगते है’ या मालिकेने त्यांना यशाच्या आणि लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचवले. या मालिकेतील राम कपूर आणि साक्षी तंवर यांच्या लिप-लॉक सीनची तुफान चर्चा झाली होती.
राम कपूर नाव उच्चारले की आपल्याला भारी भरकम वजन असलेला राम कपूर डोळ्या समोर येतो. चांगला जाड असणाऱ्या राम कपूरच्या यशात आणि लोकप्रियतेत त्याच्या वजनामुळे जराही फरक पडला नाही. मात्र असे असूनही त्याने वजन कमी करण्याचे ठरवले. त्याने जवळपास ६/८ महिन्यामध्ये ३० किलो वजन कमी केले. १२० किलो वजन असलेला राम कपूर ९० किलोचा झाला. आज राम फिट टू फॅट असे मोठ्या आणि यशस्वी ट्रान्सफॉर्मशन नंतर तो अधिकच आकर्षक दिसतो.
राम कपूरच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर त्याने गौतमी गाडगीळसोबत लग्न केले. या दोघांची पहिली भेट ‘घर एक मंदिर’ या मालिकेदरम्यान झाली. या मालिकेत या दोघांनी दीर-भावजयीची भूमिका साकारली होती. मात्र पुढे या दोघांनी लग्नगाठ बांधली. मात्र राम आणि गौतमीच्या या लव्ह स्टोरीचा प्रवास एवढा सोपा नव्हता. कारण गौतमीचे हे दुसरे लग्न होते. त्यामुळे रामच्या घरचे तयार नव्हते. मात्र त्याने त्यांना तयार केले आणि त्यांनी १४ फेब्रुवारी २००३ रोजी व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी ते विवाहबंधनात अडकले. या दाम्पत्याला दोन मुले असून मुलगी सियाचा जन्म १२ जून २००६ ला झाला तर मुलगा अक्सचा जन्म १२ जानेवारी २००९ ला झाला.
या दोघांचे नाते खूपच स्ट्रॉग आहे. जेव्हा रामने ‘बडे अच्छे लागते हैं’ मालिकेत इंटिमेट सीन दिला होता, त्यावर गौतमी म्हणाली होती की, “लग्नाच्या इतक्या वर्षानंतर एकमेकांवर इतका विश्वास असतो की तो कधीच कमी होऊ शकत नाही. राम आणि मीसुद्धा असेच नाते शेअर करतो. किसींग सीन शूट होण्याअगोदर रामने मला फोन करुन याची कल्पना दिली होती. एक पत्नी म्हणून मला धक्का जरुर बसला पण मी त्याविरुद्ध कधीच नव्हते.”
राम कपूरच्या करियरबद्दल सांगायचे झाल्यास, ‘कसम से’, ‘बडे अच्छे लगते हैं’, ‘कर ले तू भी मोहब्बत’, ‘दिल की बातें दिल ही जाने’, ‘घर एक मंदिर’, ‘कभी आए ना जुदाई’ आदी मालिका तर, ‘हमशकल्स’, ‘लवयात्री’, ‘कुछ कुछ लोचा है’, ‘मेरे डैड की मारुति’ या चित्रपटांमध्ये दिसला आहे. आगामी काळात राम कपूर ‘अभय’ आणि ‘अभय 2’ या वेबसिरीजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-बॉलिवूडच्या ‘अशा’ जोड्या जे एकमेकांपासून राहतात वेगवेगळे, पण अजूनही घेतला नाही घटस्फोट
-हद्द झाली! अमायरा दस्तूरने घातली ‘अशी’ बिकिनी; नेटकरी म्हणाले, ‘यांना नग्न व्हायला…’
-राखी सावंतने केली नाकाची शस्त्रक्रिया; व्हिडिओ शेअर करत सांगितले शस्त्रक्रियेचे कारण