अभिनेता अक्षय कुमारचा (Akshay Kumar) ‘रामसेतू’ चित्रपट प्रदर्शनाआधीच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.पौराणिक कथेवर आधारित असलेल्या या चित्रपटात मुळ कथेशी छेडछाड केल्याचा आरोप करण्यात आला आहे. हा वाद इतका वाढला आहे की सोशल मीडियावर चित्रपटावर बहिष्कार घालण्याचा ट्रेंडही मोठ्या प्रमाणावर व्हायरल होऊ लागला आहे. परंतु अभिनेता अक्षय कुमारचा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची ही पहिलीच वेळ नाही, याआधीही अनेक चित्रपटांमुळे अशा प्रकारचा वाद निर्माण झाला होता. कोणते आहेत ते चित्रपट, चला जाणून घेऊ.
खिलाडींयो का खिलाडी – अभिनेता अक्षय कुमारचा ९० च्या दशकातील ‘खिलाडी यों का खिलाडी’ चित्रपट चांगलाच गाजला होता. या चित्रपटात अभिनेता अक्षय कुमार आणि रेखा यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. चित्रपटात रेखा आणि अक्षय कुमार यांच्यामधील बोल्ड सीनवर चांगलाच वाद निर्माण झाला होता. दोघांच्या बोल्ड सीनवर प्रेक्षकांनी नाराजी दर्शवली होती.
गुड न्यूज – अक्षय कुमारचा गूड न्यूज चित्रपट चांगलाच चर्चेत आला होता. चित्रपटाला प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद पाहायला मिळाला होता. परंतु चित्रपटातील एका सीनवर प्रेक्षकांनी नाराजी दर्शवली होती. या सीनमध्ये अक्षय कुमार माझ्या मुलाचे नाव होला राम आहे कारण तो होळीच्या दिवशी जन्माला आला होता असे म्हणले होते. यावर अक्षय कुमारने नशीब तुमचा मुलगा लोहरीला प्रदर्शित झाला नाही असे म्हणले होते. यावर नेटकऱ्यांनी भगवान रामाचा अपमान केल्याचा आरोप अक्षय कुमारवर लावला होता. त्याचप्रमाणे अक्षय कुमारच्या या चित्रपटावर बंदी घालण्याचीही मागणी केली होती.
रुस्तम – अक्षय कुमार आणि इलियाना डिक्रूज यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. या चित्रपटात अभिनेता अक्षय कुमारने नेवी ऑफिसरची भूमिका साकारली होती. चित्रपट प्रदर्शनाआधी अक्षय कुमारने या चित्रपटात त्याने वापरलेली वर्दीचा लिलाव करण्याची घोषणा केली होती. यावरुनही अक्षय कुमारवर जोरदार टिका झाली होती.
लक्ष्मी – OTT प्लॅटफॉर्मवर थेट प्रदर्शित होणारा अक्षय कुमारचा हा पहिलाच चित्रपट होता. या चित्रपटाच्या नावावरून बराच वाद झाला होता. अक्षयच्या चित्रपटाचे मूळ नाव ‘लक्ष्मी बॉम्ब’ होते, ते बदलून ‘लक्ष्मी’ करण्यात आले. या चित्रपटावर हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला होता. हिंदू जनजागृती समिती आणि अखिल भारतीय हिंदू महासभेने असा दावा केला होता की हा चित्रपट लव्ह-जिहादला प्रोत्साहन देत आहे कारण अक्षयने कियारा अडवाणीने साकारलेल्या हिंदू मुलीशी लग्न करणाऱ्या मुस्लिम पात्राची भूमिका केली आहे.
सम्राट पृथ्वीराज – अक्षय कुमारचा मागील चित्रपट ‘सम्राट पृथ्वीराज’ देखील समीक्षकांच्या निशाण्यावर आला होता. हा चित्रपट हिंदू सम्राट पृथ्वीराज यांच्या जीवनावर आधारित होता, ज्यांचे नाव निर्मात्यांनी ‘पृथ्वीराज’ ठेवले होते आणि या गोष्टीवर बराच गदारोळ झाला होता. निर्मात्यांवर सम्राट पृथ्वीराजांचा आदर न केल्याचा आरोप होता. चित्रपटाचे शीर्षक बदलून सम्राट पृथ्वीराज असे न केल्यास चित्रपट प्रदर्शित करण्यास विरोध करू, अशी धमकी करणी सेनेकडून देण्यात आली होती.
- हेही वाचा –
- रँपवॉक करतोय अर्जुन, पण लक्ष वेधलं प्रेक्षकांमध्ये बसलेल्या मलायकाने, कॅमेऱ्यात कैद झाला क्षण
- ‘ज्यांना माझ्या पोस्ट आवडत नाहीत त्यांनी…’ अभिनेत्री किशोरी अंबियेंनी दिला नेटकऱ्यांना दम, पाहा संपूर्ण प्रकरण
- टॉपलेस फोटोशूट ते दिग्दर्शकासोबतचा वाद, ‘या’ कारणांमुळे वादात सापडली होती ‘बर्थडे गर्ल’ कियारा










