Thursday, January 22, 2026
Home टेलिव्हिजन नवऱ्यासोबत रोमॅंटिक व्हिडिओ शेअर केल्यानंतर का झाल्या दीपिका चिखलीया झाल्या ट्रोल? वाचा

नवऱ्यासोबत रोमॅंटिक व्हिडिओ शेअर केल्यानंतर का झाल्या दीपिका चिखलीया झाल्या ट्रोल? वाचा

एखाद्या कलाकाराची त्याच्या कामावरून प्रेक्षकांच्या मनात एका छबी निर्माण होते, आणि आपण त्यांना त्याच छबीने ओळखू लागतो. जेव्हा तो विशिष्ट कलाकार त्याची चौकट मोडत त्या छबीबाहेर जाऊन काही करतो तेव्हा त्याला समाजातील लोकांच्या रोषाला बळी पडावे लागते. असाच काहीसा प्रकार घडला आहे अभिनेत्री दीपिका चिखलीयासोबत.

रामानंद सागर यांची ‘रामायण’ ही मालिका आजही लोकप्रिय आहे. मालिकेसोबतच त्यातील कलाकरांना देखील या शोने अमाप प्रसिद्धी मिळवून दिली. याच शोमध्ये सीतेची भूमिका करणारी अभिनेत्री म्हणजे दीपिका चिखलीया. दीपिका यांनी या मालिकेत सीता ही भूमिका इतकी सुंदर निभवलीय होती की आजही ती भूमिका इतर कलाकारांसाठी अभ्यासपूर्ण ठरते. प्रेक्षकांना त्यांच्यात खरोखरच ‘सीता’ दिसत होती. त्यामुळे आज ही मालिका संपून इतके वर्ष झाले तरी दीपिका यांना त्याच्या किंवा त्याच्याशी संबंधित अर्थात भारतीय पोषाखातच लोकांना पाहायला आवडते. अभिनयासोबतच सोशल मीडीयावरही हिट असणाऱ्या दीपिका यांना असंख्य फॅन फॉलोविंग आहे. त्या सतत त्याचे विविध फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. नुकताच त्यांनी त्यांच्या नवऱ्यासोबतचा एक व्हिडिओ पोस्ट केला आणि त्यांना आता ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Dipika (@dipikachikhliatopiwala)

दीपिका यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये त्या त्यांच्या पतीसोबत हेमंत टोपीवालासोबत दिसत आहे. दीपिका यांनी शेअर केलेला व्हिडिओ हा जुना असून, यात त्या त्यांच्या पतीसोबत वेस्टर्न लूकमध्ये रोमॅंटिक होताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये आपण पाहिले तर त्यांनी क्रॉप टॉपसोबत क्रीम कलरची लूट पँट घातली असून, यासोबत त्यांनी काळया कलरचा श्रग देखील कॅरी केला आहे. या ड्रेसमुळे त्या अधिकच सुंदर दिसत आहे. यावर त्यानी साधा न्यूड मेकअप केला आणि त्यावर हाय पोनी घातली आहे. तर हेमंत यांनी काळ्या रंगाचा टीशर्ट आणि पँट घातलेली दिसत आहे. यात दोघेही एकमेकांना कॉम्प्लिमेंट करताना देखील दिसते.

दीपिकाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून, त्यावर आता नेटकऱ्यांचा कमेंट्स यायला सुरुवात झाली आहे. अनेकांनी तुम्ही सीता ही भूमिका केल्यानंतर असे कपडे घालायला नको असे म्हटले आहे, तर काहींनी त्यांना त्यांची सीतेची छबी सांभाळण्याचा सल्ला दिला आहे. काहींना त्यांचा हा मॉडर्न लूक आवडत असून त्या दोघांची केमेस्ट्री देखील भावत आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
अमृता फडणवीसांच ‘मूड बना लिया’ गाण्याने घातलाय धुमाकूळ! पोस्ट शेअर करत म्हणाल्या, ‘जल्लोष संपण्याचं…,’
आदिलसोबत लग्नावर राखी सावंतने ट्रोलर्सला दिलं सडेतोड उत्तर; म्हणाली, ‘मी खूप….’

हे देखील वाचा