प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री देबिना बॅनर्जीबद्दल एक चिंताजनक बातमी समोर येत आहे. माध्यमातील वृत्तांनुसार, अभिनेत्रीची तब्येत खराब झाली असून तिला इन्फ्लुएंझा बी व्हायरसची लागण झाली आहे. अभिनेत्रीच्या आरोग्याशी संबंधित ही माहिती तिच्या प्रवक्त्याने दिली आहे, ज्याबाबत चाहते खूप चिंतेत आहे.
देबिना झाली इन्फ्लुएंझा बी विषाणूची लागण
अभिनेत्री देबिना बॅनर्जी (debina bonnerjee) नुकतीच कुटुंबासह श्रीलंकेला गेली होती. मात्र, तेथून परतल्यानंतर काही दिवसांनी तिची प्रकृती बिघडली. तपासानंतर तिला इन्फ्लुएंझा बी विषाणूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले, पण देबिनाचा पती अभिनेता गुरमीत चौधरी (Gurmeet Choudhary) आणि त्याच्या दोन मुली लियाना आणि दिविशा यांना संसर्ग झालेला नाही. समोर आलेल्या माहितीनुसार, अभिनेत्री देखील तिच्या रिकव्हरी स्टेजवर आहे.
देबिनाच्या प्रवक्त्याने एक निवेदन जारी केले आहे की, “देबिनाच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. ती स्वत:ची आणि जेवणाची काळजी घेत आहे. यासाेबतच ती तिच्या मुलींपासूनही दूर राहून त्यांची काळजी घेत आहे. देबिना लवकरच बरी होऊन पुन्हा परत येईल.” देबिनाने तिच्या अधिकृत इन्स्टा स्टोरीवर देखील याबाबत माहिती दिली आहे. तिने सांगितले की, “ती आपल्या मुलीपासून दूर आहे आणि तिला ताप, खोकला अशी लक्षणे आहेत.”
‘रामायण’ मालिकेतून देबिना बॅटर्जीला मिळाली खरी ओळख
देबिना सध्या छोट्या पडद्यापासून दूर असली, तरी ती सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांशी जोडलेली आहे. अभिनेत्रीची साेशल मीडियावर खुप माेठा चाहता वर्ग आहे. देबिनाने ‘आहट’, ‘चिड़ियाघर’, ‘यम है हम’, ‘संतोषी मां’सह अनेक टीव्ही शोमध्ये काम केले आहे. मात्र, ‘रामायण’मध्ये सीतेची भूमिका साकारून ती घराघरात प्रसिद्ध झाली.(ramayan fame tv actress debina bonnerjee infected with influenza b virus )
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
जान्हवी विमानतळावर ‘बाॅयफ्रेंड’साेबत झाली स्पाॅट, पॅपराझींची नजर पडताच लाजली अभिनेत्री
अखेर हनी सिंगने बादशाहसाेबतच्या वादावर साेडले माैन; म्हणाला,”आम्ही कधीच मित्र…”