×

मुलीला चुकीच्या पद्धतीने उचलल्यामुळे देबीना बॅनर्जी झाली सोशल मीडियावर ट्रोल, व्हिडिओ झाला व्हायरल

नुकतेच टेलिव्हिजन विश्वातील सर्वात लोकप्रिय आणि प्रसिद्ध कपल अर्थात गुरमीत आणि देबीना आईबाबा झाले आहेत. देबिनाने एका मुलीला जन्म दिला जिचे नाव त्यांनी लियाना ठेवले. मुलीच्या जन्मानंतर देबीना आणि गुरमीत त्यांच्या मुलीसोबत वेळ घालवत आहे. असे असूनही देबीना सोशल मीडियावर सक्रिय असून ती सतत तिच्या वैयक्तिक आयुष्यातील घडामोडींबद्दल माहिती फॅन्ससोबत शेअर करत असते. नुकताच देबिनाने तिच्या मुलीसोबतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे, जो पाहून नेटकाऱ्यानी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

देबिनाने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तिने लियानाला हाताने पोटाजवळ पकडले आहे आणि ती तिचे आवडते गाणे गुणगुणत आहे. गाणे गात देबीना मुलीला घेऊन घराच्या बाल्कनीजवळ उभी राहून हळुवार डान्स देखील करत आहे. हे करताना तिने तिच्या मुलीला एका हातातच पकडले आहे. हा व्हिडिओ शेअर करताना देबिनाने कॅप्शनमध्ये लिहिले, “मुलीच्या आवडत्या गाण्याला गुणगुणताना…माझी सकाळ अशी असते.” देबिनाचा हा व्हिडिओ सर्वानाच आवडत असून, त्यावर सगळे कमेंट्स देखील करताना दिसत आहे. मात्र अनेकांनी या व्हिडिओवर प्रश्न उपस्थित केले आहे. देबिनाने ज्या प्रकारे लियानाला उचललेले आहे त्यावर अनेकांनी तिला सुनावले आहे.

View this post on Instagram

A post shared by Debina Bonnerjee (@debinabon)

एका युजरने लिहिले की, “तुला माहित आहे की, तुझ्या मुलींसाठी काय चांगले आहे आणि काय नाही. मात्र अशा पद्धतीने छोट्या बाळाला उचलणे घातक ठरू शकते.” अजून एकाने लिहिले, “सेलिब्रिटी रील बनवण्यामध्ये इतके व्यस्त असतात की, बाळाला कडेवर घेण्याच्या सध्या पद्धतींचे देखील पालन करत नाही.” दुसऱ्याने लिहिले, “मॅडम मी तुमची खूपच प्रसंशा करतो, मात्र तुम्ही ज्या पद्धतीने बाळाला पकडेल आहे ते चुकीचे आहे. तुम्हाला खूप प्रेम.” अजून एक लिहितो, ” मॅडम नीट घ्या बाळ आहे खेळणी नाही.”

तत्पूर्वी गुरमीत आणि देबीना यांची मुलगी अजून एक महिन्याची देखील झाली नाही. लियानाचा जन्म ३ एप्रिल २०२२ रोजी झाला. गुरमीत आणि देबीना यांच्यासाठी हे बाळ खूपच खास आहे, कारण लग्नाच्या १२ वर्षांनी तिचा जन्म झाला आहे.

हेही वाचा-

Latest Post