बापरे! तब्बल ३०० कोटींमध्ये बनणार ‘रामायण’ चित्रपट, पाहा कोण साकारणार राम-सीतेचे भूमिका


चित्रपट निर्माता मधु मेंटाना हे ‘रामायण’वर बिग बजेट चित्रपट बनवणार आहेत. 300 कोटींच्या बजेटमध्ये बनत असलेल्या या चित्रपटांत दीपिका पादुकोण आणि हृतिक रोशन मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

रामायण मालिकेच्या यशानंतर येतोय सिनेमा
हिंदी सिनेसृष्टीत आजपर्यंत अनेक चित्रपट हे धार्मिक ग्रंथांवर बनले आहेत. 90च्या दशकात ‘रामायण’ ही एक अशी मालिका होती, जो संपूर्ण पाहायला गल्ली गोळा व्हायची. ‘रामायण’ शोला भरपुर यश आणि प्रशंसा मिळाली. त्यामुळेच आता रामायण लवकरच मोठ्या पडद्यावर येण्यासाठी सज्ज झाले आहे. चित्रपटाची स्टारकास्टही अंतिम झाली असून या चित्रपटात दीपिका पादुकोण आणि हृतिक रोशन एकत्र दिसू शकतात.

हृतिक रोशन आणि दीपिका पादुकोण होणार राम-सिता
मिळालेल्या माहितीनुसार, या चित्रपटात मुख्य भूमिका साकारताना अभिनेता हृतिक रोशन आणि दीपिका पादुकोण यांना बघणे हा चाहत्यांसाठी एक वेगळा अनुभव असणार आहेत. मधुच्या या चित्रपटाचे दिग्दर्शन नितीश तिवारी करणार आहेत. नितीश तिवारी यांनी यापूर्वी आमिर खानचा ‘दंगल’ आणि सुशांतसिंग राजपूत आणि श्रद्धा कपूर अभिनित चित्रपट ‘छिचोरे’ दिग्दर्शित केला आहे.

मधु मेंन्टानाचा आहे ड्रिम प्रोजक्ट
‘रामायण’ चित्रपट मधु मेंन्टानाचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. हा चित्रपट 3Dमध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचे काम सुरू झाले आहे. मधु मेंन्टाना यांनी काही संशोधकांना रामायणातील रिसर्च करण्याचे आणि तथ्य काढण्याचे काम सोपवले आहे. रामायण हे एक प्रचंड मोठे महाकाव्य आहे ज्याला काही तासांच्या चित्रपटात चित्रीत करणे सोपे नाही, म्हणून मधू मेंटाणाने हा चित्रपट २ भागांमध्ये प्रदर्शित होऊ शकतो.

लवकरच दीपिका पादुकोण नाग अश्विनच्या सायंस फिक्शन फिल्ममध्ये काम करणार आहे. या चित्रपटात प्रभास आणि दीपिका पादुकोण पहिल्यांदा एकत्र दिसणार आहेत.


Leave A Reply

Your email address will not be published.