Thursday, June 13, 2024

सलमान खानसोबत ‘जुडवा’ चित्रपटात झळकली होती रंभा, आता अभिनय सोडून करते ‘हे’ काम

तुम्हाला 90च्या दशकातील ‘जुडवा‘ आणि ‘घरवाली बहारवाली‘ हे चित्रपट तुम्हाला आठवतात का? या चित्रपटामध्ये अभिनयाची जादू दाखवून प्रसिद्धी झालेली अभिनेत्री रंभा तर तुम्हाला आठवतच असेल. रंभाने अभिनयाच्या जोरावर खूप प्रसिद्धी मिळवली आहे. रंभा उर्फ ​​विजयालक्ष्मी, 90च्या दशकातील सुंदर अभिनेत्री. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये दमदार कामगिरी केली आहे.

रंभाने आपल्या करिअरची सुरुवात तेलुगू चित्रपटातून केली होती. तिचा पहिला चित्रपट ‘उल्लाताई अल्लिता’ हा आहे. ज्यामध्ये ती साऊथ अभिनेता कार्तिकसोबत झळकली होती. या चित्रपटाची कथा चांगली असली आहे. पण लोकांचे लक्ष चित्रपटातील सुंदर अभिनेत्री रंभाने वेधून घेतले होते. रंभाने तिच्या निरागसतेने आणि सौंदर्याने सर्वांना भुरळ घातली होती. बघता बघता तिची कारकीर्द खूप उंचीकडे वाटचाल करू लागली. सलमान खानच्या जुडवा या चित्रपटातून तिला बरीच ओळख मिळाली. आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथे ५ जून १९७६ रोजी रंभाचा जन्म झाला आहे. तिने 100 हून अधिक साऊथ इंडियन आणि 17 बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले.

सध्या रंभाने स्वतःला ग्लॅमरच्या जगापासून दूर केले आहे. रंभाने तेलगू, तमिळ, भोजपुरी, बंगाली आणि हिंदीसह अनेक चित्रपटात काम केले आहे. पण तिची आणि सलमान खानची जोडी बाॅलिवूडमध्ये सुपरहिठ ठरली होती. रंभाने खूप कमी वयात अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. तिचा पहिला चित्रपट रिलीज झाला तेव्हा ती फक्त 16 वर्षांची होती. रंभाने सलमानशिवाय रजनीकांत, गोविंदा, अक्षय कुमार, अजय देवगण, मिथुन चक्रवर्ती यांसारख्या दिग्गज अभिनेत्यांसोबतही काम केले आहे. ती शेवटची मल्याळम फिल्म ‘फिल्मस्टार’ मध्ये 2011 मध्ये दिसली होती.

रंभाच्या वैक्तिक आयुष्याविषयी बोलायच झाल तर, सिनेसृष्टीपासून दूर गेल्यानंतर तिने 8 एप्रिल 2010ला उद्योगपती इंद्र कुमार पद्यनाथन यांच्याशी विवाह केला. सध्या रंभा तिच्या पती आणि मुलांसह कॅनडामध्ये राहते. (Rambha was seen in the movie ‘Judwaa’ with Salman Khan)

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
वाढदिवस विशेष : बॉलिवूडचा कॉमेडी किंग विजय राजचा, असा आहे थक्क करणारा प्रवास
BIRTHDAY SPECIAL | रंभाने अभिनय सोडून केले होते लग्न, घटस्फोट आणि आत्महत्येच्या बातम्यांनी वेधले होते लक्ष

हे देखील वाचा