बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरने २००३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘इश्क विश्क’ चित्रपटामधून अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. या चित्रपटात शाहिदने एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याची भूमिका साकारली होती आणि तो अमृता रावच्या सोबत सिनेमात दिसला होता. तरुणाईला हा चित्रपट खूपच आवडला आणि दोघांचीही जोडीही खूप भावली. त्यामुळेच या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. प्राप्त माहितीनुसार, या चित्रपटाचा सिक्वेल बनवण्याची चर्चा सुरू झाली आहे. स्क्रिप्ट आणि स्टार कास्ट याचीही महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
स्क्रिप्टचे चालू आहे काम
निर्माते रमेश तौरानी या प्रोजेक्टबद्दल खूप उत्सुक आहेत. लेखकांनी पटकथेवर काम सुरू केल्याची माहिती समोर आली असून, ही पटकथा देखील तितकेच सुंदर लिहिली जात आहे. जिथे लेखक पटकथा लिहिण्यात व्यस्त असून, निर्मात्याने दिग्दर्शक आणि स्टारकास्टचा शोधसुद्धा सुरू केला आहे. मात्र, यावेळी ‘इश्क विश्क’मध्ये कोण दिसणार याबाबत काहीही माहिती मिळालेली नाही.

इश्कमध्ये शाहिद आणि अमृताची जोडी खूपच होती जमली
‘इश्क विश्क’ २००३ मध्ये प्रदर्शित झालेल्या शाहिद आणि अमृता रावची जोडी खूप आवडली होती. या दोघांशिवाय चित्रपटात विशाल मल्होत्रा, शहनाझ ट्रेझरी, नीलिमा अजीम आणि सतीश शाह हे देखील दिसले होते. चित्रपटाची स्टारकास्ट जबरदस्त होती आणि कथाही मजेदार होती. ही कथा तरुणाई स्वतःला त्याच्याशी जोडू शकली आणि सिनेमाला एवढे यश मिळाले. आजही हा चित्रपट आवडीने पाहिला जातो. चित्रपटाची केवळ कथाच नाही, तर चित्रपटातील गाणीही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. आज शाहिद कपूरने इंडस्ट्रीत एक वेगळी ओळख निर्माण केली असून, अमृता राव कुटुंबात व्यस्त असली, तरी ती मोजक्याच चित्रपटांमध्ये दिसते. ‘विवाह’ आणि ‘और लाइफ हो तो ऐसी’मध्येही हे दोघे एकत्र दिसले होते.
शाहिद कपूर भूषण कुमारसोबत ‘बुल’ या ऍक्शन चित्रपटामध्ये काम करणार असून, हा सिनेमा ब्रिगेडियर बुलसाराच्या जीवनातील वास्तविक घटनांपासून प्रेरित आहे. १९८० च्या दशकातील हा चित्रपट आदित्य निंबाळकर दिग्दर्शित करणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
–‘माझ्यासोबत एका दिग्दर्शकाने सेटवरच केली होती शिवीगाळ’, ईशा गुप्ताचा खुलासा
–अमिताभ बच्चन यांचा ‘हा’ फोटो पाहिल्यावर तुम्ही देखील नक्कीच म्हणाल, ‘वय हा फक्त आकडा आहे’
–‘कोणाचीही मुलगी, बहीण किंवा आई असूदे, मी तिच्याशीच लग्न करणार’, वाचा परेश रावल यांची लव्हस्टोरी