Wednesday, August 6, 2025
Home बॉलीवूड तब्बल २०० बाऊंसर्स अन् पाहुण्यांच्या कॅमेऱ्याला स्टिकर! आलिया-रणबीरच्या लग्नासाठी तैनात तगडी सुरक्षा

तब्बल २०० बाऊंसर्स अन् पाहुण्यांच्या कॅमेऱ्याला स्टिकर! आलिया-रणबीरच्या लग्नासाठी तैनात तगडी सुरक्षा

रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्टच्या (Alia Bhatt) लग्नाच्या बातम्या इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहेत. रणबीर आलियाच्या चाहत्यांसाठी आता या लग्नाशी संबंधित काही खास गोष्टी समोर आल्या आहेत. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचा विवाहसोहळा भव्य होणार आहे. अशा परिस्थितीत या कार्यक्रमासाठी मोठ्या स्तरावर सुरक्षा व्यवस्था देखील करण्यात आली आहे. पाहुण्यांसाठी तसेच सुरक्षा रक्षकांसाठी स्वतंत्र बँड तयार करण्यात आले आहेत.

सुरक्षा रक्षकांसाठी स्वतंत्र बँड्स
सूत्रांचे मानायचे झाले तर, रणबीर आलियाच्या लग्नात मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. या सुरक्षा रक्षकांसाठी वेगवेगळे बँडही बनवण्यात आले आहेत. सुरक्षा अनेक स्तरांमध्ये विभागली गेली आहे आणि त्यानुसार त्यांच्या प्रवेशासाठी आणि बाहेर पडण्यासाठी बँड तयार करण्यात आले आहेत. (ranbir alia wedding privacy details 200 bouncers will be managing the security)

२०० सुरक्षा बाऊन्सर
या लग्नासाठी सुमारे २०० सुरक्षा बाऊन्सरची व्यवस्था करण्यात आली आहे आणि गोपनीयता राखण्यासाठी प्रत्येकाला सर्व ठिकाणाचा ऍक्सेस देण्यात आलेला नाही. या वेगवेगळ्या बँडद्वारे त्यांची लोकेशन निश्चित केली जाईल.

पाहुण्यांनाही पाळावी लागेल गोपनीयता
रणबीर कपूर आणि आलिया भट्टच्या लग्नाची गोपनीयता राखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. लग्नाच्या ठिकाणांपासून ते विधींच्या तारखेपर्यंत सर्व काही गुप्त ठेवले जात आहे. येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यालाही ही गोपनीयता पाळावी लागेल.

पाहूण्यांच्या कॅमेऱ्यावर स्टिकर्स
कुटुंबातील सदस्यांव्यतिरिक्त, काही निवडक पाहुण्यांची यादी आहे, जे कार्यक्रमांमध्ये सहभागी होतील. परंतु त्यांच्यावर देखील नियम लादण्यात येत आहेत. येणाऱ्या पाहुण्यांचा फोन कॅमेरा बंद केला जाईल. लग्नसमारंभात पाहुण्यांच्या कॅमेऱ्यांवर स्टिकर्स लावले जातील, जेणेकरून ते कोणत्याही प्रकारे आतमध्ये फोटो आणि व्हिडिओ काढू शकणार नाहीत.

सिक्युरिटी युनिटजवळ स्टिकर्सचे रोल्स देण्यात आले असून, आता सर्व पाहुण्यांचे मोबाईल कॅमेरे कव्हर केले जातील. रणबीर आलियाच्या लग्नाचे फंक्शन्स आता सुरू होणार आहेत. मात्र, अद्याप त्यांच्या कुटुंबीयांकडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

अधिक वाचा –

Controversies | विवादांशी आहे जुनं नातं, आई-वडिलांबद्दल रणबीर कपूरने केलं होतं ‘मोठ्ठं’ वक्तव्य

आलिया भट्टने एसएस राजामौली यांच्यासोबतच्या वादावर दिले स्पष्टीकरण, सांगितले पोस्ट डिलीट करण्याचे कारण

१० वर्षांपूर्वीच आलिया भट्टने रणबीर कपूरसाठी व्यक्त केलं होतं प्रेम, जुना व्हिडिओ आला समोर

हे देखील वाचा