Wednesday, April 1, 2026
Home बॉलीवूड ‘रामायण’च्या रिलीजपूर्वी रणबीरला चाहत्याकडून मिळाली खास भेट, भेट वस्तुवर प्रभू रामांची आहे झलक

‘रामायण’च्या रिलीजपूर्वी रणबीरला चाहत्याकडून मिळाली खास भेट, भेट वस्तुवर प्रभू रामांची आहे झलक

‘रामायण’ हा या वर्षातील सर्वाधिक प्रतीक्षित चित्रपटांपैकी एक आहे. चाहते चित्रपटाबद्दलच्या अपडेट्स आणि झलकची आतुरतेने वाट पाहत होते. तर ही आतुरता संपेल कारण चित्रपटाचे निर्माते उद्या, 2 एप्रिल रोजी, हनुमान जयंतीच्या शुभ मुहूर्तावर ‘रामा’ नावाने चित्रपटाची पहिली झलक अधिकृतपणे प्रदर्शित करणार आहेत. तर या चित्रपटाचे दिग्दर्शिक नितेश तिवारी हे आहेत. तर गेल्या आठवड्यात ‘रामायण’ चित्रपटाचा विशेष प्रिव्ह्यू पाहण्याची संधी मिळाली होती. तर या कार्यक्रमाला दिग्दर्शक नितेश तिवारी, निर्माता नमित मल्होत्रा ​​आणि चित्रपटात भगवान श्रीरामाची भूमिका साकारणारे रणबीर कपूर उपस्थित होते.

‘रामायण’ या चित्रपटाच्या स्क्रीनिंगचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये अमेरिकेतील दक्षिण आशियाई बुटीक ‘नजराना’चे प्रतिनिधी रणबीर कपूरला भेटताना दिसत आहेत. त्यांनी रणबीरच्या (ranbir) अभिनयाचे कौतुक केले आणि त्याला राम मंदिराचे चित्र असलेले एक खास डिझाइन केलेले वेस्ट भेट दिले. रणबीरने या भेटवस्तूबद्दल आणि त्यामागील भावनेबद्दल कौतुक व्यक्त केले. चाहत्यांच्या मते, रणबीरच्या भूमिकेची तुलना अरुण गोविल यांनी साकारलेल्या रामाच्या अजरामर पात्राशी केली जाऊ शकते, जे त्यांच्या कठोर परिश्रमाचे प्रतीक आहे.

‘रामायण’ या चित्रपटाची आतुरता अनेक चाहत्यांना लागली आहे. या चित्रपटाच्या बाबतीत ते आतुर आसतात. तसेच या चित्रपटाचे आणखी एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे त्याचे संगीत आहे. भारतीय संगीतातील दिग्गज ए. आर. रहमान आणि ऑस्कर-विजेते संगीतकार हान्स झिमर यांनी ‘रामायण’साठी एकत्र काम केले आहे. तर हा चित्रपट 2026 दिवाळीच्या वेळी रिलीज होणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा

मित्राच्या लग्नात रश्मिका-विजयचा खास अंदाज, पतीच्या मांडीवर बसलेली दिसली अभिनेत्री, क्यूट क्षण व्हायरल

हे देखील वाचा