आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांना काही महिन्यांपूर्वीच कन्यारत्न प्राप्त झाले आणि ते आई बाबा झाले. आता कपूर खानदानात पुढच्या पिढीचे आगमन झाल्यानंतर मेडियासोबतच या दोघांच्या फॅन्सला देखील तिची चेहरा बघण्याची आस आह. मात्र आलिया आणि रणबीर यांनी त्यांच्या मुलीला राहाला अजून जगासमोर आणलेले नाही. त्यामुळे फॅन्सला त्यांच्या मुलीला बघण्याची खूप इच्छा आहे. सतत पापराजींची नजर या दोघांवर टिकलेली असते. यातच नुकतेच आलिया आणि रणबीर यांना त्यांच्या मुलीसोबत राहासोबत स्पॉट केले गेले. त्यांचे फोटो आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत.
बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट हे नुकतेच सकाळी त्यांच्या मुलीला राहाला घेऊन आऊटिंगला निघाले होते. त्यांच्यासोबत आलियाची बहीण शाहीन देखील होती. व्हायरल होणाऱ्या फोटोंपैकी एका फोटोमध्ये राहाला बेबी ट्रॉलीमध्ये ठेऊन चालताना दिसते, तर दुसऱ्या फोटोमध्ये आलियाने राहाला कडेवर घेतलेले दिसते. या व्हायरल होणाऱ्या फोटोंमध्ये आलिया आणि रणबीर काळ्या रंगाच्या कपड्यांमध्ये दिसत असून राहाचा गुलाबी रंगाचा ड्रेस आहे. या फोटोंमध्ये देखील त्यांनी राहाचा चेहरा दाखवलेला नाही.
View this post on Instagram
आलिया आणि रणबीर यांनी राहाला लाइमलाईटपासून दूर ठेवण्याचे ठरवले असून, ते तिला जगापासून लांब ठेवत आहे. या दोघांनी मीडियाला देखील विनंती केली आहे, की कोणीही तिचे फोटो काढू नये आणि व्हायरल करू नये. याबद्दल आलियाने पापराजीना सांगितले की, “मी पूर्णपणे समजू शकते की, तुम्ही तुमचे कामच करत आहात. मात्र राहा अजून खूप छोटी आहे. ती आता कुठे आमचा चेहरा पाहायला आणि ओळखायला सुरुवात केली आहे. ती अजून कोणत्याही सेलिब्रिटी लाईफला ओळखत नाही. म्हणूनच आम्ही तिचे फोटो घेण्यास मनाई केली आहे. आम्ही खूपच प्रोटेक्टिव्ह पालक आहोत.”
आलियाने पुढे सांगितले की, “जर कधी राहाचे फोटो क्लिक झाले तर ते सोशल मीडियावर पोस्ट करताना तिचा चेहरा इमोजीने झाकून मगच पोस्ट करा. राहाचे फोटो व्हायरल होऊ न देण्यासाठी त्यांनी फॅन क्लबसोबत देखील चर्चा केली आहे.”
आलिया आणि रणबीर यांनी अनेक वर्ष डेट केल्यानंतर १४ एप्रिल २०२२ रोजी लग्न केले यानंतर २ महिन्यांनी त्यांनी ती आई होणार असल्याचे सांगितले. नोव्हेंबरमध्ये राहाला जन्म दिला.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
वाढदिवसाच्या पार्टीमध्ये सतत ड्रेस सावरताना दिसली भोजपुरी स्टार आम्रपाली दुबे
हसरा चेहरा इतिहास गेहरा! गौरी नलावडेचा शाइनी लूक