Wednesday, April 23, 2025
Home बॉलीवूड लव्ह अँड वॉर’ चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर; चित्रपटाबाबत मोठी अपडेट समोर

लव्ह अँड वॉर’ चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर; चित्रपटाबाबत मोठी अपडेट समोर

संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांच्या ‘लव्ह अँड वॉर’ या चित्रपटात रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि विकी कौशल मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. ‘लव्ह अँड वॉर’ बद्दल चाहत्यांमध्ये खूप उत्सुकता आहे कारण हा तिन्ही कलाकारांचा एकत्र पहिला चित्रपट असेल. या चित्रपटाची रिलीज डेट पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे. हा चित्रपट आधी २०२५ च्या ख्रिसमसला प्रदर्शित होणार होता पण आता त्याचे प्रदर्शन आणखी लांबणीवर पडणार आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार, लव्ह अँड वॉर २०२६ च्या ईदपर्यंत (१९ मार्च २०२६) पुढे ढकलण्यात आला आहे. चित्रपटाच्या अ‍ॅक्शन दृश्यांचे चित्रीकरण नोव्हेंबर २०२५ मध्ये सुरू होईल. त्यामुळेच चित्रपटाच्या प्रदर्शनाला आणखी विलंब होत आहे.

चित्रपटाचे चित्रीकरण जानेवारी २०२६ पर्यंत पूर्ण होईल, परंतु त्यानंतर पोस्ट-प्रॉडक्शनचे काम इतक्या लवकर पूर्ण करणे कठीण होईल. त्यामुळे, मार्च २०२६ मध्ये रिलीज होणे जवळजवळ निश्चित आहे. तथापि, चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.

रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि विकी कौशल यांचे आधीच अनेक चित्रपट पाइपलाइनमध्ये आहेत, त्यामुळे चित्रपटांचे वेळापत्रक जुळत नाहीये. रणबीर आणि आलिया अनेक प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त असताना, विकी कौशल त्याच्या अलीकडील हिट चित्रपट ‘चावा’ नंतर नवीन प्रोजेक्ट्स हाती घेऊ शकतो. आलिया सध्या ‘अल्फा’ चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे तर रणबीर ‘रामायण’ चित्रपटात व्यस्त आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा

हनी सिंग चार तास उशिरा सेटवर पोहचल्यावर अशी होती अजय देवगणची ही प्रतिक्रिया, रॅपरने सांगितला किस्सा
दहशतवादी हल्ल्यामुळे कलाकारांनी व्यक्त केली हळहळ, सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल

हे देखील वाचा