Tuesday, July 9, 2024

रणबीर-आलिया यांच्या लग्नाचा शेजारच्यांना मोक्कार त्रास, थेट पोलिसांत घेतली धाव; वाचा संपू्र्ण प्रकरण

सध्या संपूर्ण सोशल मीडियावर रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्टच्या (Alia Bhatt)  लग्नाचीच जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या त्यांच्या प्रेमप्रकरणाच्या बातम्यांवर आता या लग्नाच्या गोड बातमीने फुलस्टॉप लागला आहे. या शाही विवाह सोहळ्यासाठी चित्रपट जगतातील अनेक दिग्गज कलाकार आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहिले होते. त्यामुळे या लग्नाचा चांगलाच बोलबाला पाहायला मिळत आहे. मात्र, रणबीरच्या शेजाऱ्यांनी या विवाह सोहळ्याच्या तयारीविरुद्ध थेट पोलिसात तक्रार दाखल केल्याची माहिती मिळत आहे. 

याबाबत संपूर्ण माहिती अशी की, रणबीर आणि आलियाच्या लग्न सोहळ्यामुळे त्यांच्या शेजाऱ्यांना त्रास होत आहे. ज्याची त्यांनी तक्रार दाखल केली आहे. रणबीर कपूर याचं घर बांद्र्यातील पाली हिल येथील ‘वास्तू’ इमारतीमध्ये आहे. आजूबाजूच्या परिसरामध्ये रहिवाशी राहतात.

गेल्या चार-पाच दिवसांपासून रणबीरच्या लग्नसोहळ्यामुळे या परिसरात त्याच्या चाहत्यांची आणि माध्यम प्रतिनिधींशी एकच गर्दी उसळली आहे. ज्यामुळे या शेजाऱ्यांना त्रास होत आहे. त्यामुळे एरवी शांत असलेल्या या परिसरामध्ये एकच गडबड, गोंधळ, गजबज आहे. यामुळे येथील रहिवाशांची शांतता आणि खासगीपणा धोक्यात आला आहे.

लग्नाला येणाऱ्या प्रत्येक वऱ्हाडी मंडळींचे फोटो, व्हिडिओ काढण्यासाठी सगळेच जण जीवाचा आटापिटा करत आहेत. येणाऱ्या गाड्यांच्या मागे धावत फोटो-व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या या आरड्याओरड्याचा, तिथल्या गोंगाटाचा त्रास तिथल्या रहिवाशांना होत आहे.

त्यामुळे पाली हिल रेसिडन्ट्स असोसिएशनकडे उच्चभ्रू वसाहत ‘वास्तू’च्या रहिवाशांनी अखेर तक्रार नोंदवली. या असोसिएशननं यातून मार्ग काढण्यासाठी मुंबई पोलिसांकडे मदतीसाठी धाव घेतली आहे. मीडिया वाल्यांच्या या गडबडीने आणि गर्दीने एखादा अपघात होऊ शकतो असेही त्यांनी या तक्रारीत म्हणले आहे.

( Ranbir Kapoor Alia Bhatt Wedding Neighbours Complain Meedia Invasion )

अधिक वाचा

लग्न होतं रणबीर-आलियाचं पण भाव खाऊन गेले दोन पोरांचे आईबाप असलेले सैफ-करिना

कॉलेजमध्ये सिनियर्सने रॅगिंग केले आणि कुणाल गांजावालाला सूर गवसला, वाचा त्याचा गायक होण्याचा प्रवास

Ranbir & Alia Wedding | रणबीर-आलिया यांचा शुभविवाह संपन्न, कुटुंबियांच्या साक्षीने पार पडला सोहळा, पाहा Photo

हे देखील वाचा