Wednesday, July 3, 2024

बाबो! स्टेजवरच रणबीरने घेतली अभिनेता आदित्य रॉय कपूरची पप्पी, व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी दिल्या अशा प्रतिक्रिया

रणबीर कपूर  (Ranbir Kapoor) हा हिंदी सिने जगतातील चॉकलेट बॉय म्हणून ओळखला जातो. सध्या तो त्याच्या आगामी ‘शमशेरा’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. शुक्रवारी संध्याकाळी एका अवॉर्ड फंक्शनमध्ये रणबीर आणि आदित्य रॉय कपूर यांची भेट झाली होती. दोघांनीही आपल्या उपस्थितीने चाहत्यांना ‘ये जवानी है दिवानी’च्या दिवसांची आठवण करून दिली. या दोन्ही कलाकारांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर चाहते दोघांचेही कौतुक करत आहेत. काय आहे हे नेमके प्रकरण चला जाणून घेऊ. 

आदित्य रॉय कपूर आणि रणबीर कपूर हे हिंदी सिने जगतातील तरुण आणि प्रतिभावान कलाकार म्हणून ओळखले जातात. आपल्या दमदार अभिनयासाठी आणि डॅशिंग लुकसाठी दोघांची चाहत्यांमध्ये विशेष क्रेझ आहे.आदित्य रॉय कपूर आणि रणबीर कपूर यांनी अयान मुखर्जीच्या २०१३ मध्ये आलेल्या ये जवानी है दिवानी या चित्रपटात एकत्र काम केले होते. त्यांच्या मैत्रीने सर्वांची मने जिंकली होती. दोघेही एका कार्यक्रमात पोहोचल्यावर रणबीरने आदित्यला स्टेजवर बोलावून मिठी मारली. इतकेच नाही तर रणबीरने आदित्यला पप्पीही दिली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

रणबीर आणि आदित्य कपूरचा ब्रोमान्स पाहून नेटकऱ्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.  एका चाहत्याने यावर कमेंट करताना “बॉलिवुडचे 2 देखणे अभिनेते,” असे म्हणत त्यांचे कौतुक केले आहे. तर दुसऱ्याने “दोघेही सिनेजगतातील सर्वात स्टायलिश तरुण आहेत,” असे म्हणत त्यांचे कौतुक केले आहे. तर एकाने “ये जवानी है दिवानी” चित्रपटाचा सीन असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. बर्‍याच युजर्सनी या चित्रपटातील ‘बनी’ आणि अवीच्या भूमिकेची आठवण झाल्याचे सांगितले आहे.  तर एकाने आदित्य-रणबीरमधील ‘ब्रोमान्स’ पाहत त्यांच्या मैत्रीचे कौतुक केले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

 

दरम्यान २०१३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘ये जवानी है दिवानी’ चित्रपट चांगलाच गाजला होता. या चित्रपटात रणबीर कपूर, आदित्य कपूरसोबत अभिनेत्री दीपिका पदुकोणनेही प्रमुख भूमिका साकारली होती. चित्रपटातील कथा आणि गाण्यांनी प्रेक्षकांना चांगलेच वेड लावले होते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हे देखील वाचा