Friday, July 5, 2024

कडेकोट बंदोबस्त असूनही रणबीर-आलिया यांच्या लग्नातील Video झालाय Viral, पाहा व्हिडिओ

मागील अनेक दिवसांपासून चर्चेत असलेले बॉलिवूडमधील जोडपे, म्हणजेच अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर यांचा शाही विवाहसोहळा गुरुवारी (दि. १४ एप्रिल) रोजी थाटामाटात पार पडला. अतिशय खासगीत पार पडलेल्या या विवाहसोहळ्यात माध्यमांना बिलकूल एन्ट्री नव्हती. मात्र, तरीही बंदीच्या सर्व भिंती पार करुन रणबीर आणि आलिया यांच्या लग्नाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. (Alia Bhatt and Ranbir Kapoor Wedding)

पाहा लग्नातील व्हायरल व्हिडिओ….

‘वास्तू’ बंगल्यावर या जोडप्याने सात फेरे घेत जीवनातील नव्या प्रवासाची सुरुवात केली. दरम्यान हा लग्नसोहळा अतिशय खासगी स्वरुपात पार पडला. लग्नाला केवळ जवळचे नातेवाईक आणि खास निमंत्रित मित्रमंडळी उपस्थित होते. आलिया आणि रनबीर यांच्या लग्नाच्या प्रत्येक विधींची माहिती गुप्त ठेवण्यात आली होती. ( Ranbir Kapoor And Alia Bhatt Wedding Video Leaked Watch Viral Video )

अधिक वाचा

Ranbir & Alia Wedding | रणबीर-आलिया यांचा शुभविवाह संपन्न, कुटुंबियांच्या साक्षीने पार पडला सोहळा, पाहा Photo

लग्न होतं रणबीर-आलियाचं पण भाव खाऊन गेले दोन पोरांचे आईबाप असलेले सैफ-करिना

नवरीसाठी आवडता बर्गर ते वऱ्हाड्यांची चिकन-मटनपासून सगळीच सोय; पाहा रनबीर-आलियाच्या लग्नातील मेन्यू

हे देखील वाचा