बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर सतत त्याच्या चित्रपटामुळे चर्चेत असतो. आजकाल अभिनेता आलिया भट्टसोबत त्याच्या नात्यामुळे आणि लग्नामुळे चर्चेत आला आहे. अशातच शनिवारी तो मुंबईत स्पॉट झाला. मात्र, यादरम्यान रणबीर कपूरचा मूड थोडा वेगळा वाटला. पॅपराजींसमोर पोझ न देता तो त्याच्या कारमधून निघून गेला. यादरम्यान एक व्हिडिओ समोर आला आहे, जो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
व्हिडिओमध्ये रणबीर कपूर एका इमारतीतून बाहेर पडताना दिसत आहे. यावेळी त्याने डेनिम जीन्स, ग्रे टी-शर्ट आणि कॅप घातली होती. तो गाडीजवळ येतो आणि गाडीचा दरवाजा उघडतो. तोपर्यंत पॅपराजींचा घोळका त्याच्याजवळ येतो. रणबीर सर्व फोटोग्राफर्सना बाजूला येण्यास सांगतो. यादरम्यान फोटोग्राफर्स त्याला पूर्ण फोटो क्लिक करून घेण्याची विनंती करतात, पण तो मान्य करत नाही आणि गाडीचा दरवाजा धरून उभा राहतो. यावेळी पॅपराझी त्याला वेगळ्या अँगलमध्ये फोटो क्लिक करण्याची विनंती करतात. तेव्हा रणबीर कपूर म्हणतो, “अच्छा, मी काय करू?” मग तो गाडीत बसून निघून जातो. व्हिडिओमध्ये एका फोटोग्राफरचा आवाजही ऐकू येत आहे, जो म्हणतो, “तो भडकला आहे.” (ranbir kapoor asks what should i do after paparazzi crowd around his car)
लवकरच करणार आलिया भट्टसोबत लग्न
रणबीर कपूर लवकरच आलियासोबत लग्न करणार असल्याच्या बातम्या येत आहेत. या वर्षी डिसेंबरपर्यंत हे दोन्ही स्टार्स लग्नबंधनात अडकणार असल्याची चर्चा सर्वत्र जोर धरून आहे. मात्र, आतापर्यंत रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांनी या वृत्तांवर मौन बाळगले आहे. दोघांना अनेकदा एकत्र स्पॉट केले जाते.
‘या’ चित्रपटात एकत्र दिसणार आलिया आणि रणबीर
आलिया भट्ट आणि रणबीर कपूरचा ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपट बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. अयान मुखर्जी दिग्दर्शित हा सुपरहिरो चित्रपट आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चनही दिसणार आहेत. याशिवाय रणबीरने नुकताच लव रंजनचा एक चित्रपट साईन केला आहे, ज्यामध्ये श्रद्धा कपूर देखील दिसणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-सुर्याचा दमदार ड्रामा चित्रपट आहे ‘जय भीम’, पाहण्यापूर्वी वाचा रिव्ह्यू
-वडिलांची परवानगी मिळाली असती, तर सलमान असता जुहीचा पती; लग्नासाठी हात मागायलाही गेला होता, पण…