बॉलिवूडचा चॉकलेट बॉय आणि हार्ट ब्रेक झालेल्या तरुणाईचा चाहता रणबीर कपूर मंगळवारी (२८ सप्टेंबर) त्याचा वाढदिवस साजरा करतो. ‘ए दिल है मुश्किल’ या चित्रपटातील त्याच्या अभिनयाने चाहत्यांच्या हृदयामध्ये स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले. त्याच्या सुरुवातीच्या कारकिर्दीमध्ये त्याने अनेक चित्रपट केले परंतु यशाचे शिखर त्याला लवकर गाठता आले नाही. बॉलिवूडचा रॉकस्टार आता ३९ वयाचा झाला आहे. वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात त्याचा आतापर्यंतचा प्रवास.
रणबीरचा जन्म मुंबईमध्ये २८ सप्टेंबर १९८२ रोजी झाला. बॉलिूडमधील जुन्या आणि नावाजलेल्या कपूर कुटुंबियातील ऋषी कपूर आणि नीतू कपूर यांच्या घरी तो जन्माला आला. त्याचे प्राथमिक शिक्षण माहीमच्या बॉम्बे स्कॉटिश स्कूलमध्ये झाले. त्यानंतर त्याने उच्च शिक्षणासाठी अमेरिका गाठली आणि न्यू यॉर्कच्या लि स्ट्रॅसबर्ग थिएटर ऍंड फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये अभिनयाचे धडे गिरवले. (Ranbir Kapoor birthday special here are some interesting facts about chocolate boy life)
अभिनयाचे शिक्षण घेतल्यानंतर, साल २००७ मध्ये संजय लीला भन्साळी यांच्या ‘सॉंवरीया’ चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ‘जब से तेरे नैना’ गाण्यातील मादक डान्स पासूनच तो चॉकलेट बॉय झाला आणि रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवू लागला. या चित्रपटामध्ये त्याने फिल्मफेअर सर्वोत्तम पुरुष पदार्पण पुरस्कार देखील जिंकला होता. पण त्याचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. त्यानंतर ‘बचना ए हसिनो’, ‘लक बाय चान्स’, ‘वेक अप सिड’ या चित्रपटांमध्ये त्याने अभिनय केला. पण त्याचे हे चित्रपट फार चर्चेत नव्हते. साल २००९ मध्ये आलेला ‘अजब प्रेम की गजब कहाणी’ यामधील त्याच्या अभिनयाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले होते. त्याने आपल्या कारकिर्दीमध्ये ‘रॉकस्टार’, ‘बर्फी’, ‘ये जवानी है दिवानी’, ‘तमाशा’, ‘बकेट लिस्ट’, ‘संजू’ अशा अनेक चित्रपटांमध्ये दमदार अभिनय केला.
ऐश्वर्याला फसवले
कपूर कुटुंबीयांमध्ये रणबीरच उच्चशिक्षित आहे. पण शिक्षणाशी संबंधित तो ऐश्वर्या रायसोबत खोटं बोलला होता. शालेय शिक्षणातील आयुष्याचा मोठा टप्पा असलेली १० वी रणबीरने ५४.३ टक्के मिळवत पार केली. ऐश्वर्याने एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्याच्या १०वी चा एक किस्सा सांगितला होता. ती म्हणाली की, “रणबीरला १०वी मध्ये कमी गुण मिळाले होते. पण त्याने मला तो ६५ गुणांनी उत्तीर्ण झाल्याचे सांगितले. तसेच तो म्हणाला होता की, एवढ्या गुणांमध्येच माझे कुटुंबीय माझे किती कौतुक करत आहेत.” रणबीरची १० वी संपल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी एक मोठी पार्टी ठेवली होती. यामध्ये बॉलिवूडचे अनेक कलाकार आले होते.
इमरान खानची पत्नी अवंतिकाच्या पडला होता प्रेमात
बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी चॉकलेट बॉय अवंतिका मलिकच्या प्रेमात होता. दोघे एकमेकांना खूप पसंत करायचे. त्यावेळी दोघेही खूप तरुण होते. रणबीर तिच्या प्रेमात पूर्ण वेडा झाला होता. तो रोज सेटवर तिचे शूटिंग पाहण्यासाठी आणि तिला भेटण्यासाठी जायचा. त्यावेळी अवंतिका ‘जस्ट मोहोब्बत’ या मालिकेमध्ये बाल कलाकाराची भूमिका साकारत होती. दोघांनी एकमेकांना पाच वर्षे डेट केले.
या अभिनेत्रींबरोबर जोडले होते नाव
रणबीर तसा आधीपासूनच चॉकलेट बॉय असल्याने त्याचे बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींबरोबर नाव जोडले गेले आहे. त्याने दीपिका पदुकोणपासून ते कॅटरिना कैफपर्यंत अनेक अभिनेत्रींना डेट केले होते. त्याने प्रियंका चोप्रा, नरगिस फाखरी, सोनम कपूर अशा अनेक अभिनेत्रींना आपल्या मनातली गोष्ट सांगितली होती. सध्या हा चॉकलेट बॉय अभिनेत्री आलिया भट्टच्या प्रेमात आहे.
दिग्दर्शक म्हणून देखील केलंय काम
अभिनेत्याने बॉलिवूडमध्ये संजय लीला भन्साळी यांच्यासोबत सहयोगी दिग्दर्शक म्हणून आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली. त्याने अमिताभ बच्चन आणि राणी मुखर्जी अभिनित ‘ब्लॅक’ या चित्रपटासाठी संजय यांच्या बरोबर दिग्दर्शन केले होते.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-जेव्हा महेश भट्ट यांना समजवण्यासाठी नग्नावस्थेत रस्त्यावर धावल्या होत्या परवीन बाबी, मग पुढे…
-सिनेमागृह सुरू करण्यास शासनाचा हिरवा कंदील, तरीही ‘लाल सिंग चड्ढा’ प्रदर्शनाची तारीख लांबणीवरच