रणबीर कपूर (Ranbir Kapoor) मुख्य भूमिकेत असलेला संदीप रेड्डी वंगा यांचा ‘ॲनिमल’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड यशस्वी ठरला होता. हा चित्रपट गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये प्रदर्शित झाला होता आणि आजपर्यंत लोक याविषयी बोलताना दिसतात. हा चित्रपट सुपरहिट असला तरी त्याला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला. लोकांच्या एका वर्गाने चित्रपटातील “महिलाविरोधी” दृश्यांवर टीका केली तर काही लोकांनी रणबीरच्या कामाचे कौतुक केले. आता रणबीरने या चित्रपटाबाबत होत असलेल्या टीकेवर पहिल्यांदाच मौन सोडले आहे.
नुकत्याच झालेल्या निखिल कामथसोबतच्या एका पॉडकास्टमध्ये रणबीर म्हणाला, “चित्रपटाला जो टॅग मिळाला आहे, तो योग्य नाही. एक विशिष्ट प्रकारचा समज या चित्रपटाबाबत कायम आहे. जर तुम्ही सामान्य प्रेक्षकांना विचारलत तर ते चित्रपटाबद्दल चांगल्या गोष्टी बोलतात. पण हा चित्रपट तू करायला नको होता असे म्हणणारे देखील बरेच लोक आहेत.
रणबीर पुढे म्हणाला, “मी फक्त त्यांचे म्हणणे शांतपणे ऐकले आणि माफी मागितली. मी म्हणालो, ‘माफ करा, मी पुढच्या वेळी असा चित्रपट करणार नाही.’ पण, मी असे करणार नाही, कारण मी जीवनाच्या अशा टप्प्यावर आहे जिथे मला कोणाशीही वाद घालायचा नाही, मी समोरच्याची माफी मागेन आणि पुढच्या वेळी अधिक मेहनत करेन.
रणबीरने असेही सांगितले की जेव्हा त्याने ‘ॲनिमल’ ची कथा ऐकली तेव्हा तो घाबरला होता आणि त्याला वाटलं की हा चित्रपट खूपच बोल्ड आहे, ज्यामुळे त्याच्या प्रतिमेला कदाचित हानी पोहोचू शकते कारण त्याने त्याच्या चित्रपटांमध्ये नेहमीच एका चांगल्या व्यक्तीची भूमिका केली आहे. मात्र, असे चित्रपट पुन्हा करणार का, असे विचारल्यावर रणबीर म्हणाला, ‘१०० टक्के.’
रणबीर म्हणाला, “माझ्या कारकिर्दीत मी एकप्रकारे स्तब्ध होतो. मला खूप दिवसांपासून ‘नेक्स्ट सुपरस्टार’ म्हटले जात होते आणि… मी आजही असे म्हणत नाही की मी सुपरस्टार आहे. जोपर्यंत तुम्ही एकामागून एक सुपरहिट चित्रपटांची रंग लावत नाही तोपर्यंत तुम्हाला सुपरस्टार म्हणता येणार नाही, पण मला वाटते की, माझ्या आत्मविश्वासासाठी, एका मुलाच्या भूमिकेतून पुरुषाच्या भूमिकेत बदलणे माझ्यासाठी योग्य होते आणि तसेच चित्रपट मी केले”
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
फॅशन शोमध्ये वेगळे बसलेले दिसले मलायका आणि अर्जुन, व्हिडिओ चर्चेत
लग्नानंतर तापसीने पहिल्यांदा पतीचा फोटो केला शेअर, ऑलिम्पिकमध्ये तिरंगा फडकवताना दिसला मॅथियास