Sunday, April 20, 2025
Home बॉलीवूड यंदा कर्तव्य आहे! रणबीर आणि आलिया अडकणार लग्नबंधनात; इटलीत घेणार सात फेरे?

यंदा कर्तव्य आहे! रणबीर आणि आलिया अडकणार लग्नबंधनात; इटलीत घेणार सात फेरे?

दिवाळीनंतर अनेक बॉलिवूड कलाकार लग्नबंधनात अडकणार अशी चर्चा सुरू आहे. यामध्ये कॅटरिना कैफ आणि विकी कौशलसह आता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट ही जोडी देखील चांगलीच चर्चेत आहे. हे दोघे देखील याच वर्षी लग्नगाठ बांधणार, असे अनेक चाहत्यांना वाटत आहे. अशात या दोघांच्या लग्नाविषयी आता एक अशी बातमी समोर आली आहे, जी ऐकून तुम्हालाही वाटेल की, रणबीर आणि आलिया याच वर्षी लग्न करतील.

यंदा आलिया आणि रणबीरचे लग्न पक्के?
रणबीर कपूरने नुकतेच त्याच्या ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. तसेच आता तो त्याच्या आगामी ‘ऍनिमल’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होणार अशी चर्चा सुरू होती. मात्र, अशात आता तो या चित्रपटाच्या शूटिंगला जानेवारी २०२२ मध्ये सुरुवात करणार, अशी माहिती समोर आली आहे. दुसरीकडे आलिया देखील ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत तिची सर्व कामे पूर्ण करणार आहे आणि जानेवारी २०२२ पर्यंत फ्री राहणार आहे. यामुळे या मधल्या कालावधीमध्ये नीतू कपूर यांच्या घरी ती सून म्हणून प्रवेश करणार असल्याची आशा चाहते व्यक्त करत आहेत. (Ranbir Kapoor postpone his schedule upcoming movie animal forage wedding with Alia Bhatt)

साल २०२० मध्येच या दोघांच्या लग्नाच्या चर्चेला उधाण आले होते, परंतु कोरोनामुळे या दोघांना लग्नबंधनात अडकता आले नाही. त्यामुळे साल २०२१ च्या शेवटी नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये दोघे लग्न करू शकतात.

असेही म्हटले जात आहे की, आलिया आणि रणबीर अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीप्रमाणे इटलीमध्ये लग्न करणार आहेत. तसेच त्यांच्या लग्नामध्ये फक्त कुटुंबातील काही व्यक्ती आणि जवळचे काही मित्र उपस्थित राहतील.

तसेच कॅटरिना आणि विकी देखील डिसेंबरपर्यंत लग्नबंधनात अडकणार आहेत. दोघेही सध्या त्यांच्या लग्नासाठी लागणारे कपडे निवडत आहेत. यावेळी कॅटरिना सिल्क कापड असलेला घागरा परिधान करणार आहे. तसेच विकी देखील खास पोषाखामध्ये दिसणार आहे. दोघांच्या लग्नाच्या या सर्व चर्चा सुरू आहेत. परंतु या दोघांनी देखील यावर कोणतीही प्रतिक्रिया न देता मौन बाळगले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-उर्वशी रौतेलाची जादू पाहिली का? हवेत लटकताना दिसली काकडी; पाहून तुम्हीही व्हाल हैराण

-अंदमानातील सेल्युलर जेलला भेट देताना स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल गौरवोद्गार काढत कंगना म्हणाली…

-कॅन्सरवर उपचार सुरू असताना महेश मांजरेकरांनी केले होते ‘अंतिम’चे शूटिंग

हे देखील वाचा