Wednesday, July 3, 2024

इंस्टाग्राम लाईव्ह करताना बेबी बंप लपवत होती आलिया, रणबीर कपूरने केली ‘अशी’ फजिती

अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) हे हिंदी सिने जगतातील क्यूट कपल म्हणून ओळखले जातात. आलिया आणि रणबीरची लवस्टोरी सिने जगतात प्रचंड गाजली. त्यानंतर त्यांनी लग्नगाठ बांधत सर्वांनाच सुखद धक्का दिला होता. त्यानंतर अलिकडेच अभिनेत्री आलिया भट्टने गूड न्यूज दिली होती ज्याची सिने जगतात प्रचंड चर्चा रंगली होती. आलिया सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. सध्या एका लाईव्ह सेशनमध्ये रणबीरने तिची चांगलीच फजिती केल्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यावर नेटकऱ्यांनीही जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. काय आहे हा व्हिडिओ चला जाणून घेऊ. 

आलिया भट्ट ‘ब्रह्मास्त्र’ दिग्दर्शक अयान मुखर्जीसोबत इंस्टाग्रामवर लाईव्ह सेशन करत असताना रणबीर कपूर लाइव्ह सेशनमध्ये आला.  रणबीर सोशल मीडियावर जास्त सक्रिय नसतो. आलिया अयानसोबत गप्पा मारत असताना रणबीरही त्यांच्या संभाषणात सामील झाला. त्यांच्या चित्रपटातील ‘केसरिया’ या गाण्याच्या रिलीजबद्दल बोलण्यासाठी हे तिघे एकत्र आले होते. चॅट दरम्यान रणबीरने त्याच्या ‘पत्नी’चे कौतुकही केले. लाईव्ह सेशनमध्ये, आलिया तिच्या घरी बसली होती, रणबीरने नवीन रिलीजबद्दल विचारले आणि त्यानंतर त्याला अयानसोबत काम करण्याचा अनुभव विचारण्यात आला.

अयानचे कौतुक करताना रणबीर म्हणाला, “अयानसोबत काम करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो अत्यंत प्रतिभावान आहे. माझा त्याच्यावर खूप विश्वास आहे आणि मी त्याच्या प्रतिभेचा मोठा चाहता  आहे. भविष्यात दिग्दर्शक म्हणून तो चित्रपटसृष्टीत काय साध्य करणार आहे, याबद्दलही रणबीरने मत व्यक्त केले.

त्यानंतर आलियाने रणबीरला त्याच्यासोबत काम करण्याचा अनुभव सांगण्यास सांगितले. रणबीर पुढे म्हणतो, ‘मला आठवतं की जेव्हा मी ‘हायवे’ पाहिला तेव्हा मी अयानच्या घरी आलो, तिथे फक्त अयान आणि करण उपस्थित होते आणि त्याला म्हणाले- ‘ये तो अमिताभ बच्चन निकली.’ हा त्याचा दुसरा चित्रपट आहे. माझी भविष्यवाणी खरी ठरली, पण नवरा बायकोबद्दल चांगल्या गोष्टी बोलेल. या सगळ्यामध्ये प्रेग्नंट असलेली आलिया भट्ट निळ्या रंगाच्या ड्रेसखाली तिचा बेबी बंप लपवताना दिसली. ‘केसरिया’ हे गाणे अरिजित सिंगने गायले असून अमिताभ भट्टाचार्य यांनी लिहिले आहे. या गाण्याला प्रीतमने संगीत दिले आहे. 2 मिनिट 52 सेकंदाचे हे गाणे ईशा आणि अयानच्या प्रेमकथेबद्दल सांगते. ‘ब्रह्मास्त्र’ हा रणबीर आणि आलियाचा एकत्र पहिला चित्रपट आहे. यात अमिताभ बच्चन, नागार्जुन आणि मौनी रॉय यांच्याही भूमिका आहेत. हा चित्रपट ९ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा –

खरच की काय? एस.एस. राजामौली करणार होते ‘बजरंगी भाईजान’ चित्रपटाचे दिग्दर्शन, पण ऐनवेळी बाहुबलीमुळे…

रागात असलेल्या भुमीने जेव्हा आयुष्मान खुरानाला मारली होती ८ वेळा कानाखाली, मग अभिनेत्यानेही…

जेव्हा रूममध्ये बॉयफ्रेंडसोबत रंगे हाथ पडकली गेली होती प्रियांका चोप्रा, लालबुंद झालेल्या मावशीने केलं ‘हे’ काम

 

हे देखील वाचा