जेव्हा रूममध्ये बॉयफ्रेंडसोबत रंगे हाथ पडकली गेली होती प्रियांका चोप्रा, लालबुंद झालेल्या मावशीने केलं ‘हे’ काम

बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) हिचे नाव, एक स्त्री तिच्या आयुष्यात काय काय करू शकते हे सांगण्यासाठी पुरेसे आहे. या अभिनेत्रीने अल्पावधीतच खूप नाव कमावले असून, आजही तिचा प्रवास अखंडपणे सुरूच आहे. पण तिचे बालपणही सामान्य मुलीसारखेच गेले. तिने आपले शालेय शिक्षण अमेरिकेतून केले आणि यादरम्यान तिने असे काही केले, जे ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.

बॉयफ्रेंडसोबत पकडली गेली
अभिनेत्रीने गेल्या वर्षी तिचे एक पुस्तक लाँच केले होते, ज्याचे नाव ‘अनफिनिश्ड’ होते. या पुस्तकात अभिनेत्रीने काही धक्कादायक खुलासे केले आहेत. तिने १०वीच्या वर्गातील असाच एक किस्सा शेअर केला, जेव्हा ती तिच्या बॉयफ्रेंडसोबत पकडली गेली होती.

दहावीत झाले होते प्रेम
आपल्या पुस्तकात प्रियांकाने दहावीच्या आठवणींना उजाळा दिला आहे. त्या काळात ती अमेरिकेत शिकण्यासाठी तिच्या नातेवाईकांकडे गेली होती. त्यादरम्यान ती बॉब नावाच्या मुलाच्या प्रेमात पडली. घरात कोणी नसताना अभिनेत्री बॉबला घरी बोलवायची. अशाच एका दिवशी बॉब आणि प्रियांका हातात हात धरून घरी टीव्ही पाहत होते. तेवढ्यात अभिनेत्रीची मावशी पायऱ्या चढत आत येत होती. ही वेळ मावशीच्या घरी येण्याची नव्हती. ती अचानक आल्यामुळे दोघेही घाबरले. आता बॉबला बाहेर जाण्यासाठी दुसरा मार्ग नव्हता. अशा स्थितीत दोघेही खोलीच्या दिशेने धावले. अभिनेत्रीने तिच्या बॉयफ्रेंडला खोलीत लपण्यास सांगितले.

खावा लागला मावशीचा ओरडा!
प्रियांकाने तिच्या पुस्तकात पुढे लिहिले की, “मी बॉबला सांगितले की मी मावशीला किराणा दुकानात पाठवत नाही तोपर्यंत तिथेच राहा. किरण मावशी घरात शिरली आणि प्रत्येक खोलीकडे लक्षपूर्वक पाहू लागली. मी अभ्यास करतेय असे वाटावे, यासाठी मी माझ्या बेडवर बायोलॉजीचे पुस्तक घेऊन बसले होते. ती माझ्या खोलीच्या उंबरठ्यावर आली आणि ‘उघड’ म्हणाली आणि मी ‘काय उघडू’ असे विचारले. मावशी म्हणाली, ‘कपाट उघड’. मी घाबरून गेले होते, कारण मी याआधी मावशीला कधीच रागवताना पाहिले नव्हते. मी कपाटाचा दरवाजा उघडला आणि त्यातून एक मुलगा बाहेर आला. मावशीने माझ्या आईला फोन केला आणि म्हणाली, ‘ही माझ्याशी खोटे बोलली, यावर माझा विश्वास बसत नाहीये. तिच्या कपाटात एक मुलगा होता.”

प्रियांका चोप्राने स्वतःला एवढ्यापुरतेच मर्यादित ठेवले नाही, तर तिने पुढे जाऊन खूप नाव कमावले. तिने २००० मध्ये एक सौंदर्य स्पर्धा जिंकली आणि मागे वळून पाहिले नाही. आज या अभिनेत्रीचे नाव केवळ बॉलिवूडमध्येच नाही तर हॉलिवूडमध्येही गाजत आहे. गायक निक जोनासशी लग्न करून अभिनेत्रीने आपले घर स्थायिक केले आहे आणि अजूनही ती तिच्या करिअरला उड्डाण देत आहे.

हेही वाचा :

Shocking: प्रसिद्ध अभिनेत्रीच्या कुटुंबावर शोककळा! २६ वर्षाच्या एकुलत्या एक मुलाने केली आत्महत्या

दुख:द! केर्सी सोराबजी दारूवाला यांचे निधन, वयाच्या ६८व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

संगीत अन् गायकीने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करायचे शंकर दासगुप्ता, रेल्वे स्टेशनवर ‘इतका’ भयंकर झाला त्यांचा मृत्यू

Latest Post