Monday, July 1, 2024

खरंच! आयुष्यातील पहिली किस म्हणत रणबीर कपूरने घेतले होते माधुरी दीक्षितचे नाव, सांगितले कधी आणि कसे

कपूर घराण्यातील आघाडीचा अभिनेता म्हणजे रणबीर कपूर. ‘सांवरिया’ चित्रपटापासून करियरला सुरुवात केली, आणि कमी वेळातच त्याने आपला चाहतावर्ग तयार केला. हा बॉलिवूडचा ‘चॉकलेट बॉय’ म्हणूनही ओळखला जातो. त्याच्यासाठी कोट्यावधी मुली वेड्या आहेत, तर रणबीर कपूर हा आत्ता आलिया भटसाठी  वेडा आहे. पण तो लहानपणापासूनच माधुरी दीक्षित हिचा खूप चाहता आहे. लहानपणी रणबीर कपूरला बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री माधुरी दीक्षित आवडली होती. या गोष्टीची रणबीरने स्वत:एका जुन्या मुलाखतीत कबुली दिली आहे.

खरं तर, आरजे मलिश्काला दिलेल्या एका जुन्या मुलाखतीत रणबीर कपूरने बालपणीच्या दिवसांमध्ये, अभिनेत्री माधुरी दीक्षित किती आवडते, हे सांगितले. मलिष्काने रणबीरला तीन प्रश्न विचारले आहेत, आणि त्या तिन्हीही उत्तरात त्याने माधुरी दीक्षितचे नाव घेतले होते.

रणबीर कपूर याला विचारले की, पहिले क्रश कोण होतं? तर त्याने लगेच उत्तर दिले की, माधुरी दीक्षित. मग दुसर्‍या प्रश्नात, पहिला ब्रेकअप कोणाशी झाला होता? त्याने पुन्हा माधुरी दीक्षित हे नाव घेतले. यानंतर, हसत हसत मलिष्काने विचारले, पहिली किस कोणाला केली होती? त्यालाही उत्तर देत रणबीरने माधुरी दीक्षितचेच नाव घेतले.

रणबीर कपूरचे उत्तर ऐकताच प्रत्येकजण हसू लागले, आणि सगळेच आश्चर्यचकित झाले होते. आरजे मलिश्काने विचारले विचारले की, तू खर सांगत आहेत? त्याला उत्तर देताना रणबीर म्हणाला, “तू मासिकाला कधी किस केले नाहीस का?” यामुळे हे स्पष्ट होते की, रणबीरने माधुरी दीक्षितला प्रत्यक्षात किस केले नाही, तर माधुरी दीक्षितचा फोटो असलेल्या मासिकाला किस केले होते.

काही दिवसांपूर्वी रणवीर आणि आलिया या दोघांनाही कोरोना झाला होता. योग्य ती काळजी घेत ते दोघेपण यातून सुखरूप बाहेर पडले आहेत. त्यानंतर त्यांच्या मालदीव ट्रीपची खूप चर्चा होत आहे. नुकतेच आलियाने सोशल मीडियावर कोरोना रुग्णांसाठी मदत व्हावी म्हणून काही माहिती दिली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-दानशूर अजय देवगण धावून आला मराठी माणसांसाठी, शिवाजी पार्कमधील कोव्हिड आयसीयूला केली अशी मदत

-प्रियांका चोप्राला या अवतारात पाहून चाहते झाले हैराण, फोटो झाला सोशल मीडियावर व्हायरल

-नुसता राडा…राडा! अल्लू अर्जुनच्या ‘बुट्टा बोम्मा’ गाण्याने मोडले इतर गाण्यांचे रेकॉर्ड; मिळाले तब्बल ५९ कोटींपेक्षाही अधिक व्ह्यूज

हे देखील वाचा