मागील अनेक दिवसांपासून ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार आहेत. याबाबत माहिती विचारली जात आहे. अशातच चित्रपट निर्माते अयान मुखर्जीने शुक्रवारी (३ डिसेंबर) रोजी असे संकेत दिले की, ते त्यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘ब्रह्मास्त्र’च्या प्रदर्शनाची तारीख लवकरच सगळ्यांना सांगणार आहे. अशातच त्याने सोशल मीडियावर केलेली एक पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे.
अयानने सोशल मीडियावर रणबीर कपूरसोबत एक बीटीएस फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये रणबीर कपूर स्पेशल इफेक्टसोबत आगीच्या गोळ्यासोबत दिसत आहे. (Ranbir Kapoor seen playing with fire ayan Mukerji shares BTS picture from the sets of brahmastra)
अयानने ही पोस्ट शेअर करून लिहिले आहे की, “द टाईम फिल्म्स राईट, बरोबर अडीच वर्षापूर्वी मी इंस्टाग्रामवरील प्रवास सुरू केला. ‘ब्रह्मास्त्र’चे शूटिंग चालू झाल्यानंतर आम्हाला चित्रपट आणखी चांगला बनवण्यासाठी वेळ पाहिजे होता. काही दिवसांसाठी संपूर्ण जग थांबले होते. या सगळ्यात प्रत्येक दिवशी ‘ब्रह्मास्त्र’ चालू होता. सगळ्यांच्या प्रेम आणि समर्पणाची आम्हाला गरज होती. ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटातील काही गोष्टी शेअर करायची आता ही योग्य वेळ आली आहे, आम्ही लवकरच या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख सांगणार आहोत. ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपट प्रदर्शित होण्याबाबत अनेक अंदाज लावले जात आहे. असे म्हटले जात आहे की, हा चित्रपट पुढच्या वर्षी गणेशोत्सवात प्रदर्शित होणार आहे. परंतु चित्रपटाच्या निर्मात्यांनी याबाबत अजून कोणतीही घोषणा केली नाही
‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटाचे तीन पार्ट असणार आहेत. यातील पहिल्या भागात अमिताभ बच्चन, आलिया भट्ट, नागार्जुन अक्कीनेनी आणि मौनी रॉय दिसणार आहे.”
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-मिलिंद गुणाजी यांच्या मुलाचा साखरपुडा थाटात पडला पार, सूनबाई आहेत ‘या’ क्षेत्राशी निगडित
-ऐकलंत का! गायिका योगिता बोराटेंचा ‘प्रेमरंग’ कार्यक्रम लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला