Thursday, February 22, 2024

रणबीरच्या ‘अ‍ॅनिमल’ने बॉक्स ऑफिसवर पाडला पैशांचा पाऊस; 10व्या दिवशी केली तब्बल ‘एवढ्या’ कोटींची कमाई

रणबीर कपूर आणि बॉबी देओलच्या ‘अ‍ॅनिमल‘ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. रिलीज होऊन 10 दिवस उलटले तरी या चित्रपटाची क्रेझ अजूनही वाढत आहे. चित्रपटगृहे प्रेक्षकांनी खचाखच भरलेली दिसत आहेत. या चित्रपटातील रणबीर कपूर आणि बॉबी देओलच्या अभिनेयाने प्रेक्षकांची मन जिंकून घेतली आहे. हा चित्रपट बाॅक्स ऑफिसवर चांगलाच धूमाकूळ घालत आहे.

ऍक्शन, क्राइम, बोल्ड सीन, इमोशन आणि रोमान्स यासह संपूर्ण मनोरंजनाचा मसाला असलेला ‘अ‍ॅनिमल’ (Animal) रिलीजच्या पहिल्या दिवसापासून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला असून प्रदर्शित होऊन 10 दिवस उलटूनही हा ट्रेंड थांबत नाहीये. ‘अ‍ॅनिमल’ने रिलीजच्या पहिल्या आठवड्यात 337.58 कोटी रुपयांचे कलेक्शन केले होते. दुसऱ्या आठवड्यातही चित्रपटाने चांगला व्यवसाय केला आहे.

दुसऱ्या शुक्रवारी या चित्रपटाने 22.95 कोटी रुपयांची कमाई केली, तर दुसऱ्या शनिवारी चित्रपटाच्या कमाईत 51.37 टक्क्यांनी वाढ झाली आणि ‘अ‍ॅनिमल’ने34.74 कोटी रुपये कमवले. आता दुसऱ्या रविवारच्या म्हणजेच चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या 10व्या दिवसाच्या कमाईचे प्रारंभिक आकडे आले आहेत. रिलीजच्या 10व्या दिवशी 37 कोटींची कमाई केली आहे. यासह हा चित्रपट 10 व्या दिवशी सर्वाधिक कलेक्शन करणारा दुसरा चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाने दहाव्या दिवसाच्या कमाईत अनेक चित्रपटांना मागे टाकले आहे. ‘अ‍ॅनिमल’अनेक चित्रपटांचा विक्रम मोडून 10व्या दिवशी सर्वाधिक कलेक्शनच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.

‘अ‍ॅनिमल’ हा एक थ्रिलर चित्रपट आहे. या चित्रपटात रणबीर कपूर आणि बॉबी देओल यांच्यासोबत अनिल कपूर, रश्मिका मंदान्ना आणि तृप्ती डिमरी देखील प्रमुख भूमिकांमध्ये आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन संदीप रेड्डी वंगा यांनी केले आहे. ‘अ‍ॅनिमल’च्या यशामुळे बॉलिवूडमध्ये एक नवी क्रांती झाली आहे. ‘अ‍ॅनिमल’मधील रणबीर कपूरच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. रणबीरने या चित्रपटात पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. त्याच्या भूमिकेची विशेष प्रशंसा होत आहे. (Ranbir Animal collected 37 crores on its 10th day at the box office)

आधिक वाचा-
‘या’ कारणामुळे अमिताभ बच्चन आहेत निराश, स्वतः पोस्ट करून केला खुलासा
‘अ‍ॅनिमल’मधील लग्नातल्या ‘त्या’ सीनवर वाद वाढताच बॉबी देओलने तोडले मौन, म्हणाला- ‘मला काही…’

हे देखील वाचा