बॉलिवूडमधील चर्चेत अभिनेत्री म्हणून अमिषा पटेलची ओळख आहे. चित्रपटांमध्ये तिला विशेष असे यश मिळाले नसले तरी तिने तिची लोकप्रियता टिकून ठेवली आहे. अध्या ती तिच्या आगामी ‘गदर 2’ साठी गाजत आहे. मात्र आता तिच्या बाबतीत एक तिला चिंतेत टाकणारी बातमी समोर येत आहे. रांची कोर्टाने अमिषा विरोधात वारंट जारी केला आहे.
रांची येथील सिविल कोर्टाने अमिषा पटेल आणि तिचा पार्टनर असलेल्या कृणाल विरोधात धोकाधडी आणि चेक बाउंस झाल्यामुळे एक वारंट जारी केला आहे. झारखंड फिल्म निर्माता असलेल्या अजय कुमार सिंग यांच्या तक्रारीवरून तिच्या आणि तिच्या पार्टनरच्या विरोधात धोकाधडी, धमकी आणि चेक बाउंस झाल्याचा गुम्हा दाखल केला. समन दिल्यानंतरही अमिषा कोर्टात तिची बाजू सांगण्यासाठी उपस्थित झाली नाही. कोर्टात ना अमिषा आली नाही तिचे वकील त्यामुळे कोर्ट नाराज झाले आहे. आता याप्रकरणावर १५ एप्रिल रोजी पुढील सुनावणी होणार आहे.
View this post on Instagram
दरम्यान अमिषावर सीआरपीसी कलम 420 आणि 120 च्या अंतर्गत तक्रार दाखल करण्यात आली आहे. अजय कुमार सिंग यांनी सांगितले की, अमिषा आणि कृणालने त्यांच्याकडून ‘देसी मॅजिक’ सिनेमाच्या प्रमोशनसाठी आणि निर्मितीसाठी २.५ कोटी रुपये घेतले. सोबतच त्यांनी हे देखील सांगितले की, अमिषा आणि कृणाल यांनी चितार्पत पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण पैसे व्याजासकट परत देण्याचे कबूल केले होते. मात्र त्यांनी असे केले नाही.
‘देसी मॅजिक’ सिनेमाचे शूटिंग २०१३ साली सुरु झाले होते. मात्र अजूनपर्यंत हा सिनेमा प्रदर्शित झाला नाही. जेव्हा निर्मात्यांनी अमिषा आणि कृणालकडे पैसे मागितले तेव्हा त्यांनी नाही दिले. बऱ्याच दिवसांनी आमिषाने त्यांना २०१८ ऑक्टोबरमध्ये २.५ कोटी आणि ५० लाखांचा चेक दिला मात्र तो बाउंस झाला होता.
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
HAPPY BIRTHDAY : जेव्हा चुलत बहिनीने जितेंद्र यांच्यावर लावला होता लैंगिक शोषणाचा आरोप, ऐकून सगळ्यांनाच बसला होता आश्चर्याचा झटका
Jackie Chan Birthday: जॅकी चॅनचे बॉलिवूडशी खास नाते, ‘या’ चित्रपटांमध्ये भारतीय कलाकारांसोबत केले आहे काम