Saturday, July 6, 2024

रणदीप हुड्डाची मायावतींवर अश्लील कमेंट; होतेय अटक करण्याची मागणी

बऱ्याच वेळा अनेकजण सहज काहीतरी मजा- मस्तीने बोलायला जातात. पण बोलता बोलता आपण असे काहीतरी बोलून जातो, ज्यामुळे आपल्याला लोकांच्या रागाला सामोरे जावे लागते. असंच काहीसं एका बॉलिवूड कलाकारासोबत झाले आहे. बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा याने उत्तर प्रदेशमधील माजी मुख्यमंत्री आणि बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्षा मायावती यांच्यावर अश्लील कमेंट केली. ज्यामुळे तो सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. त्याने मायावती यांचे नाव घेऊन त्यांना सेक्सिस्ट आणि जातीवादी असं म्हणून त्यांची मस्करी केली आहे. त्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. त्याचा हा व्हिडिओ समोर येताच त्याला सगळेजण लवकरात लवकर माफी माग असे सांगत आहे. परंतु हा व्हिडिओ जुना आहे असे म्हटले जात आहे.

मायावती यांच्यावरून अशी मस्करी केल्याने आता रणदीप हुड्डा याला नेटकऱ्यांनी चांगलेच सुनावले आहे. त्याचा जो व्हिडिओ व्हायरल होत आहे, त्यामध्ये तुम्ही पाही शकता की, तो समोर बसलेल्या प्रेक्षकांना म्हणतो की, “मी तुम्हाला आज एक वाईट विनोद सांगणार आहे. एकदा मायावती दोन लहान मुलांसोबत जात असते. तेव्हा एका व्यक्तीने तिला विचारले की, ही मुले जुळी आहेत का?? यावर ती उत्तर देते की, नाही एक चार वर्षाचा आहे आणि दुसरा आठ वर्षाचा आहे. यानंतर तो व्यक्ती म्हणतो, मला विश्वासच नाही बसत की, एखादा व्यक्ती तिथे दोन वेळाही जाऊ शकतो.”

यामुळे नेटकरी खूपच तापले आहेत. इतकेच नव्हे, तर नेटकरी त्याला अटक करण्याची मागणी करत आहेत.

हा व्हिडिओ शेअर करून एका युजरने ट्वीट केले आहे की, “बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा एका अशा दलित महिलेबाबत बोलत आहे, जिने पीडितांविरुद्ध आवाज उठवला आहे.” युजरने याला सेक्सिस्ट आणि जातीवाद याचे रूप दिले आहे. एका दुसऱ्या युजरने लिहिले आहे की, “रणदीप हुड्डा यावरून असं समजत आहे की, तू किती सेक्सिस्ट, जातीवादी आणि मूर्ख आहे.”

उत्तर प्रदेशमधील माजी मुख्यमंत्री मायावती यांचे समर्थक त्यांना ‘आयरन लेडी’ म्हणतात. राज्यामध्ये स्वतःच्या हिमतीवर सरकार बनवल्याने सगळेजण त्यांचे कौतुक करत असतात. यातच रणदीप हुड्डा याने केलेला हा विनोद त्याला चांगलाच महागात पडू शकतो.

https://twitter.com/Aye_leftist/status/1397233276369215491

रणदीप हुड्डाच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास त्याने नुकतेच सलमान खानचा बहुचर्चित चित्रपट ‘राधे: योर मोस्ट वाँटेड भाई” या चित्रपटात काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा