Friday, March 14, 2025
Home मराठी ‘रंग माझा वेगळा’ मालिकेने गाठला ५०० एपिसोड्सचा टप्पा, कलाकारांनी ‘अशा’प्रकारे साजरा केला खास क्षण

‘रंग माझा वेगळा’ मालिकेने गाठला ५०० एपिसोड्सचा टप्पा, कलाकारांनी ‘अशा’प्रकारे साजरा केला खास क्षण

आजच्या एकविसाव्या शतकात देखील आपल्या समाजात मोठ्या प्रमाणात वर्णभेद केला जातो. अनेकवेळा अनेक ठिकाणी गोऱ्या रंगाच्या माणसांना आणि सावळ्या रंगाच्या माणसांना वेगळी वागणूक दिली जाते. या एका आगळ्या-वेगळ्या विषयावर भाष्य करणारी स्टार प्रवाहवर ‘रंग माझा वेगळा’ नावाची मालिका आहे. मागच्या वर्षी या मालिकेला सुरुवात झाली. एक वेगळी कहाणी घेऊन आलेल्या या मालिकेला प्रेक्षकांनी देखील खूप चांगला प्रतिसाद दिला. या मालिकेने ५०० भागांचा टप्पा गाठला आहे. या निमित्त मालिकेतील कलाकारांनी हा क्षण साजरा केला आहे.

सोशल मीडियावर सध्या स्टार प्रवाहवरील ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेतील टीमचे काही फोटो व्हायरल होताना दिसत आहेत. या फोटोमध्ये कलाकारांनी काळ्या रंगाचा टी-शर्ट घातला आहे. ज्या टी-शर्टच्या मागे ‘रंग माझा वेगळा’ असे लिहिलेले दिसत आहे. फोटोमध्ये संपूर्ण टीम खूप खुश दिसत आहे. ( Rang maza vegala serial’s 500 episode’s complete, actors celebrate this occasion)

तसेच स्टार प्रवाहच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून देखील या मालिकेचे शीर्षक गीत शेअर केले आहे. यामध्ये मालिकेतील आतापर्यंतचे महत्वाचे अनेक सीन दाखवले आहेत.

हा व्हिडिओ शेअर करून लिहिले आहे की, “आज सादर होत आहे, ‘रंग माझा वेगळा’ मालिकेचा ५०० वा एपिसोड. आपण या ५०० भागांच्या प्रवासात मोलाची साथ दिली आणि भरभरून प्रेम केलं. त्याबद्दल सर्व प्रेक्षकांचे मनोपूर्वक आभार.! त्याचबरोबर या मालिकेचे निर्माते, दिग्दर्शक, कलाकार, तंत्रज्ञ या सगळ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार. आतापर्यंत दिलेलं प्रेम आणि आशीर्वाद असेच पुढे राहो हीच प्रार्थना.”

सावळा रंग असल्याने एका मुलीला समाजातून अनेक गोष्टींसाठी नकार येतात. सर्व ज्ञान असून देखील केवळ रंग सावळा असल्याने तिला अनेक मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते. लग्न झाल्यानंतर सासूला तर सावळ्या रंगाचा स्पर्श देखील झालेला चालत नाही, तरी देखील त्या घरात राहून ती सगळ्यांचे मन जिंकून घेते. अशाप्रकारे या मालिकेची कहाणी दाखवली आहे. या मालिकेत अनेक वळणं पाहायला मिळाली आहेत. मालिकेत आता ६ वर्षांचा लिफ दाखवला आहे. त्यामुळे मालिकेची कहाणी एका रंजक वळणावर आली आहे. मालिकेत रेशमा शिंदे आणि आशुतोष गोखले हे मुख्य भूमिकेत आहेत. या व्यतिरिक्त हर्षदा खानविलकर, अनघा भागरे, अंबर गणपुळे हे कलाकार आहेत.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-कृष्णा अभिषेकने असे काय केले की, नेहा कक्करला कोसळले रडू? पाहा ‘हा’ व्हिडिओ

-‘आम्ही दोघांनी अजूनही लग्न नाही केले’, म्हणत सलमान खानने केला आयुष्यातील खऱ्या प्रेमाचा खुलासा

-TMKOC: एकेकाळी कर्जात पूर्णपणे बुडाला होता ‘सोढी’; मग कर्जदारांपासून वाचण्यासाठी केलं ‘हे’ काम

हे देखील वाचा