Wednesday, July 3, 2024

‘जेव्हा घरातून लव्ह मॅरेजला परमिशन मिळते…’ रंग माझा वेगळा फेम रेश्मा शिंदेची ‘ती’ पोस्ट झाली व्हायरल

मराठी कलाकारांची प्रेक्षकांमध्ये एक वेगळीच क्रेझ आहे. मराठी चित्रपटातील कलाकरांना जेवढे प्रेम दर्शक देतात तेवढेच प्रेम मालिकांमधल्या कलाकारांना देखील मिळते. आज मराठी टेलिव्हिजनविश्वातील कलाकारांची क्रेझ बॉलिवूड सेलिब्रिटींना टक्कर देणारी आहे. टीव्ही इंडस्ट्रीमधील जवळपास सर्वच मोठ्या कलाकरांना अमाप मोठी फॅन फॉलोविंग आहे. या माध्यमांवरील मालिका तर प्रेक्षकांच्या अतिशय आवडीचं आहेत. अशातच टीव्हीवरील नंबर १ मालिका असणाऱ्या ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेतील सध्याचे कथानक अतिशय आनंदाचे आणि सुखाचे आहे. सध्या मालिकेत पुन्हा एकदा दीपा आणि कार्तिक यांचे लग्न दाखवले जातात आहे. बऱ्याच काळानंतर मालिकेत दीपा आणि कार्तिक पुन्हा एकत्र आल्याचे आता प्रेक्षकांना दिसणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Reshma Shinde (@reshmashinde02)

या मालिकेत ‘दीपा’ ही भूमिका साकारणारी अभिनेत्री रेश्मा शिंदे सोशल मीडियावर तुफान सक्रिय आहे. ती सतत तिचे फोटो आणि मालिकेबद्दलची अपडेट तिच्या फॅन्सला देत असते. अशातच रेश्माने तिचा एक फोटो इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केला असून, सध्या हा फोटो आणि या फोटोला तिने दिलेले कॅप्शन चांगेलच व्हायरल होत आहे. रेश्माने तिचा ‘दीपा’च्या लूकमधील एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये तिने मुंडावळ्या बांधलेल्या दिसत असून, ती गाडीच्या खिडकीमधून बाहेर आलेली दिसत आहे.

रेश्माने तिच्या या फोटोला पोस्ट करताना कॅप्शनमध्ये लिहिले, “जेव्हा घरातून लव्ह मॅरेजला परमिशन मिळते, तेव्हा नवरी सासरी जाताना”. असे लिहिले आहे. तिच्या या पोस्टवर तिच्या फॅन्ससोबतच अनेक सेलिब्रिटी कमेंट्स करताना दिसत आहे. तत्पूर्वी रेश्मा शिंदेने ‘महाराष्ट्राचा सुपरस्टार’ या शोमधून इंडस्ट्रीमध्ये एन्ट्री केली होती. त्यानंतर ती लगोरी, बंध रेशमाचे, नांदा सौख्य भरे, चाहूल आदी अनेक मालिकांमध्ये काम केले असून, तिची स्टार प्रवाहावरील ‘रंग माझा वेगळा’ ही मालिका सध्या तुफान गाजत आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
खिलाडी कुमार आणि सिरिअल किसर पहिल्यांदाच एकत्र, पाहिलात का चित्रपटाचा ट्रेलर?
सुनील शेट्टीच्या दिलदार अंदाजाने जिंकले चाहत्यांचे मनं, मराठी भाषेत म्हणाला, ‘आम्ही सर्वजण…’

हे देखील वाचा