Monday, June 23, 2025
Home भोजपूरी गेल्या दोन वर्षांपासून ‘या’ आजाराशी झुंज देतेय राणी चॅटर्जी, पोस्ट शेअर करत मांडली व्यथा

गेल्या दोन वर्षांपासून ‘या’ आजाराशी झुंज देतेय राणी चॅटर्जी, पोस्ट शेअर करत मांडली व्यथा

राणी चॅटर्जी ही भोजपुरी इंडस्ट्रीमधील सर्वात लोकप्रिय आणि यशस्वी अभिनेत्रींपैकी एक आहे. तिच्या सौंदर्यासोबतच तिच्या अभिनयाचेही लाखो चाहते आहेत. आपल्या मेहनतीच्या आणि कौशल्याच्या जोरावर तिने या चित्रपट विश्वात आपला ठसा उमटवला आहे. मात्र नुकतेच राणी चॅटर्जीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून, सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. तिने आपल्या पोस्टमध्ये अशी गोष्ट सांगितली आहे, ज्यामुळे तिचे चाहते चिंतेत पडले आहेत. गेल्या दोन वर्षांपासून ती ऍलर्जीसारख्या आजाराशी झुंज देत असल्याचे, तिने सोशल मीडियावर सांगितले आहे.

राणी चॅटर्जीने तिच्या फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये तिने तिची व्यथा मांडली आहे. तिच्या सोबत राहून तिला जज करणाऱ्या लोकांवरही तिने निशाणा साधला आहे. मुलींना त्यांच्या शरीराचा आकार आणि रंगानुसार विनाकारण जज करणार्‍या सर्व लोकांना राणीने चोख प्रत्युत्तर दिले आहे. (rani chatterjee is suffering from allergic disease for the last two years)

सोबतच तिने असेही सांगितले की, गेल्या दोन वर्षांपासून ती अशा ऍलर्जीच्या आजाराशी झुंज देत आहे, त्यामुळे तिला तिच्या व्यावसायिक जीवनात अडचणींचा सामना करावा लागत आहे. यावर ती कधीच उघडपणे बोलली नाही, मात्र आता तिने या पोस्टच्या माध्यमातून चाहत्यांपर्यंत आपली बाजू मांडली आहे.

राणीने फेसबुकवर एक लांबलचक पोस्ट लिहिली आहे, ज्याचा स्क्रीनशॉट तिने इंस्टाग्रामच्या स्टोरीमध्येही शेअर केला आहे. तिने लिहिले की, “मागील दोन वर्षांपासून मला ऍलर्जी आहे, पण मी हे कधीही कोणाशीही शेअर केले नाही. आज मी तुम्हा सर्वांना हे सांगत आहे, कारण लोक खूप जजमेंटल झाले आहेत. लोकांना आम्हा अभिनेत्रींना परफेक्ट पोशाखात बघायचे आहे. मेकअप नाही केल्यावर तुम्ही जज करता, मेकअप केल्यावरही तुम्ही जज करता. मला सांगायचे आहे की, मी कोणाला दाखवण्यासाठी काहीही करत नाही. माझ्या आयुष्यातील एकही दिवस कोणीही जगू शकणार नाही. त्यामुळे जज करू नका.”

आगामी प्रोजेक्टचा भाग आहे राणी
राणी चॅटर्जी भोजपुरी चित्रपटांमध्ये खूप सक्रिय आहे. तिचे अनेक चित्रपट रांगेत आहेत. भोजपुरीसोबतच आता राणी ओटीटी आणि बॉलिवूडमध्ये काम करण्याचा प्रयत्न करत आहे. ती आता महिलाप्रधान चित्रपटांमध्ये काम करताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच तिने ‘भाभी माँ’ या नवीन चित्रपटाचे पोस्टर शेअर करून, चित्रपटाच्या प्रदर्शनाची माहिती दिली.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अनेक वर्षांपूर्वीच झाली होती ‘ओमिक्रॉन व्हेरिएंट’ची भविष्यवाणी! व्हायरल होतोय चित्रपटाचा पोस्टर

-कॉमेडियन कृष्णा अभिषेकने केली विकी- कॅटरिनाच्या लग्नाची गुप्त माहिती लीक, सांगितल्या महत्वाच्या गोष्टी

-Bigg Boss 15: प्रतीक सहजपालवर भडकली तेजस्वी प्रकाश; म्हणाली, ‘सांगू का, टास्कमध्ये तुझे हात कुठे कुठे लागतात?’

हे देखील वाचा