Wednesday, January 14, 2026
Home भोजपूरी हॉटनेसचा तडका! राणी चॅटर्जीचे ग्लॅमरस अवतारातील फोटो व्हायरल, पाहून चुकला चाहत्यांच्या काळजाचा ठोका

हॉटनेसचा तडका! राणी चॅटर्जीचे ग्लॅमरस अवतारातील फोटो व्हायरल, पाहून चुकला चाहत्यांच्या काळजाचा ठोका

‘भोजपुरी क्वीन‌’ राणी चॅटर्जी ही तिच्या ग्लॅमरस फोटोंनी आणि अंदाजाने नेहमीच सोशल मीडियावर आग लावत असते. तिच्या चाहत्यांना देखील तिचा हा अंदाज खूप आवडतो. तिचे फोटो नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. नुकतेच तिने सोशल मीडियावर तिचे ग्लॅमरस फोटो वेगवेगळ्या अंदाजात शेअर केले आहे. जे सध्या खूप चर्चेत आहेत. तिने हे फोटो शेअर करून अगदी काही वेळ झाला आहे, पण हे फोटो सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घालताना दिसत आहेत.

राणीने शेअर केलेल्या या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, तिने एक रंगीत ग्लॅमरस टॉप परिधान केला आहे. तिने सांगितले आहे की, हे फोटो सकाळचे आहेत. तिने काही फोटो बॅक साईने काढले आहेत. या फोटोमध्ये तिने तिचे सगळे केस पुढे घेतले आहेत.

या फोटोमध्ये ती खूपच हॉट दिसत आहे. तिच्या फोटोंनी चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला आहे. या फोटोंवर चाहते लाईक्स आणि कमेंट करून कौतुकाचा पूल बांधताना दिसत आहे.

राणीने या आधीदेखील असे अनेक ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यामुळे चाहते तिचे दीवाने झाले आहेत. सोशल मीडियावर तिचे 14 लाखांपेक्षाही अधिक फॅन फॉलोविंग देखील खूप आहे. राणीने भोजपुरी चित्रपटसृष्टीत अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. ती भोजपुरीमधील एक आघाडीची अभिनेत्री आहे.

तिने ‘नागिन’, ‘घरवाली बाहरवाली’, ‘दीवाना’, ‘जानम’, ‘ससुरा बडा पैसावाला’, ‘इच्छाधारी’, ‘दरिया दिल’, ‘सरकार राज’ यांसारख्या अनेक चित्रपटात काम केले आहे. यानंतर ती खूप चर्चेत आली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा