भोजपुरी अभिनेत्रींना आता पॅन इंडिया ओळख मिळत आहे. नॅशनल टेलिव्हिजनवर देखील विविध कार्यक्रमांमध्ये या अभिनेत्रींना पाहिले जाते. अशीच एक भोजपुरीमधील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे राणी चॅटर्जी. बोल्ड, बिनधास्त, स्पष्टवक्ता असलेली राणी भोजपुरी इंडस्ट्रीमध्ये तुफान प्रसिद्ध आहे. राणी अनेक बाबींवर तिचे मतं मांडताना दिसते. तिच्या मतांमुळे अनेकदा राणीला लोकांच्या रोषाला देखील सामोरे जावे लागले आहे. एवढेच नाही तर राणीने भोजपुरी इंडस्ट्रीमधील पुरुष कलाकारांबद्दल देखील अनेक गोष्टी जगासमोर बोलल्या आहेत. त्यामुळे ती सतत लाइमलाईट्मधे आली.
View this post on Instagram
राणी चॅटर्जी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रिय आहे. ती नेहमीच तिच्या फॅन्ससोबत संपर्कात असते. तिचे फोटो, व्हिडिओ, चित्रपटांची माहिती ती सतत शेअर करत असते. मात्र राणीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली असून, त्यात तिने ती सोशल मीडियापासून काही काळ लांब राहणार असल्याचे सांगितले आहे. राणीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीमध्ये सांगितले आहे की, “मी सोशल मीडियापासून ब्रेक घेत आहे. धन्यवाद.” तिच्या या पोस्टनंतर तिचा प्रोफाईल फोटो देखील दिसत नाही.
राणी चॅटर्जीने अनेक भोजपुरी चित्रपटांमध्ये काम केले असून ती तिच्या अभिनयासोबतच तिच्या सौंदर्यामुळे आणि तिच्या बोल्डनेसमुळे ओळखले जाते. ती तिच्या फिटनेसमुळे देखील खूप चर्चेत असते. ती अनेकदा इंस्टाग्रामवर तिच्या योगाचे आणि व्यायामाचे व्हिडिओ पोस्ट करत असते. तिने सोशल मीडियापासून लांब जाण्याचे फॅन्सला सांगितल्यानंतर तिच्या फॅन्सला मोठा धक्का बसला आहे. त्यांनी तिला परत येण्याची विनंती केली आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
नोरा फतेहीने जॅकलिन फर्नांडिस विरोधात दाखल केला मानहानीचा खटला
ज्येष्ठ रंगकर्मी तथा अभिनेते महेश कोठारे यांचे वडील अंबर कोठारे यांचे दुःखद निधन