Wednesday, April 30, 2025
Home कॅलेंडर लहानपणी ज्या अभिनेत्याची होती फॅन, त्याच्यासोबतच केला पहिला चित्रपट; राणी मुखर्जीने सांगितला रंजक किस्सा

लहानपणी ज्या अभिनेत्याची होती फॅन, त्याच्यासोबतच केला पहिला चित्रपट; राणी मुखर्जीने सांगितला रंजक किस्सा

राणी मुखर्जी (Rani Mukerji) ही हिंदी चित्रपट जगतातील एक आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आपल्या दमदार अभिनयाने आणि सोज्वळ सौंदर्याने, तिने सिने जगतात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. 90 च्या दशकातील एक यशस्वी अभिनेत्री म्हणून राणी मुखर्जीच्या नावाचा समावेश होतो. मात्र सिने  जगतात आपल्या अभिनयाची छाप पाडणाऱ्या राणी मुखर्जीला अभिनय जगतात यायचेच नव्हते. या गोष्टीचा खुलासा खुद्द राणी मुखर्जीने एका मुलाखतीत केला होता. काय आहे तो किस्सा चला जाणून घेऊ.

अभिनेत्री राणी मुखर्जीच्या अभिनयाचे आणि लूकचे असंख्य चाहते सिने जगतात पाहायला मिळतात. 90 च्या दशकातील यशस्वी रोमँटिक अभिनेत्री म्हणून राणी मुखर्जीच्या नावाचा प्रामुख्याने समावेश होतो. तिला ‘गुलाम’ आणि ‘कुछ कुछ होता है’ चित्रपटांनी प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. लहानपणी राणी मुखर्जी शाहरुख खान आणि आमिर खानची मोठी चाहती होती. ती लहान असताना तिने आमिर खानची ऑटोग्राफही घेतली होती. यावेळी आमीर खान जुही चावलासोबत चित्रपट करत होता. मात्र ऑटोग्राफ देताना आमिर खान तिच्यासोबत खूपच रागाने बोलला, ज्यामुळे राणी दुखावली होती.

रानी मुखर्जीने अभिनय जगतात पाऊल ठेवल्यानंतर, आमीर खानसोबतच ‘गुलाम’ चित्रपटात काम केले. याच चित्रपटातील एक मजेशीर किस्सा रानी मुखर्जीने एका मुलाखतीत बोलताना सांगितला होता. तिने सांगितले की, जेव्हा ती आमिरसोबत ‘गुलाम’ चित्रपटासाठी शूटिंग करत होती, तेव्हा तिने त्याला त्या प्रसंगाची आठवण करुन देत विचारले की, “आमिर तुला आठवत आहे की, मी लहान होते तेव्हा तू मला ऑटोग्राफ दिला होता. तू खूप रागीट होतास.” यावर आमिर खानने “राणी, तू खोटं बोलत आहेस, मी मुलांशी किंवा कोणाशीही असभ्य नाही,” असे उत्तर दिले.

मात्र यानंतर राणीने घरी जाऊन तो ऑटोग्राफ त्याला दाखवला. दरम्यान ‘गुलाम’ हा राणीचा पहिला चित्रपट होता आणि या चित्रपटातून तिला ओळखही मिळाली होती. लोक राणीला ‘खंडाळा गर्ल’ या नावाने ओळखू लागले. यानंतर तिने ‘कुछ कुछ होता है’, ‘कभी खुशी कभी गम’, ‘कभी अलविदा ना कहना’ असे अनेक चित्रपट केले. नुकत्याच आलेल्या ‘बंटी और बबली’ या चित्रपटाच्या सिक्वेलमध्येही राणी दिसली होती. (rani mukerji and amir khan intresting story)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
हेमा मालिनी यांनी वयाच्या 74व्या वर्षी केला बॅले डान्स, परफॉर्मन्स पाहून चाहते थक्क

पॅपराझींना पोज दिल्याने सैफ करीनावर रागावला? अभिनेत्रीने केला धक्कादायक खुलासा

हे देखील वाचा