ते म्हणतात ना हौसेला मोल नसते. ही ओळ कलाकरांना अगदी तंतोतंत लागू होते. कलाकारांच्या बाबतीतही असेच आहे. कलाकार त्यांना पाहिजे ते पाहिजे तेव्हा आणि वाट्टेल त्या किंमतीत अगदी सहज घेऊ शकतात. सामान्य लोकांना मुंबईत घर घेण्याआधी हजार वेळा विचार करावा लागतो. मात्र कलाकार अगदी लीलया कोट्यवधींची घरे घेताना आपल्याला दिसतात.
मागील अनेक काळापासून मीडिया आणि चित्रपटांपासून लांब असणारी अभिनेत्री राणी मुखर्जी अचानक चर्चेत आली आहे. राणी चर्चेत येण्याचे कारणही तसेच आहे. मुंबईच्या खार भागात एका पॉश ठिकाणी तिने एक मालमत्ता खरेदी केली असून, मीडिया रिपोर्टनुसार, राणीने या वर्षी ही प्रॉपर्टी खरेदी केली आहे. राणीने 4 BHK चे एक मोठे अपार्टमेंट घेतले आहे. हे घर घेतल्यानंतर आता राणी क्रिकेटर क्रिकेटर हार्दिक पंड्या आणि कुणाल पंडया यांची, अभिनेता टाइगर श्रॉफ यांची शेजारी झाली आहे. (rani mukerji bought a luxurious flat)

प्राप्त माहितीनुसार राणीचे हे घर २२ मजल्यांच्या इमारतीमध्ये असून, ३५४५ स्क्वेयर फूटचे सर्व सुख सोयी सुविधांनी युक्त आहे. तिच्या या नवीन घरात पार्किंगसाठी देखील मुबलक जागा उपलब्ध असून या अपार्टमेंटमध्ये एक आऊटडोअर फिटनेस सेंटर आहे. एडवेंचर स्पोर्ट्सची आवड असणाऱ्या लोकांसाठी इथे रॉक क्लाइम्बिंगची सुद्धा येथे सुविधा आहे. मुख्य म्हणजे तिच्या या नव्याघरातून समुद्राचे अतिशय सुरेख दर्शन होते. एका माहितीनुसार राणीच्या या नव्या अपार्टमेंटची किंमत तब्बल ७.१२ कोटी इतकी आहे.
राणीच्या वर्क फ्रंटबद्दल सांगायचे झाले तर लवकरच ‘मिसेज चटर्जी vs नॉर्वे’ य तिच्या आगामी चित्रपटात दिसणार आहे. राणी मुखर्जीच्या या चित्रपटाची निर्मिती निखिल आडवाणी आणि झी स्टुडिओ करत आहेत. सध्या ती या सिनेमाच्या शूटिंगसाठी परदेशात असल्याचे सांगितले जात आहे. याआधी राणी २०१९ साली ‘मर्दानी 2’ या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर दिसली. या चित्रपटाला प्रेक्षकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला. राणी आगामी काळात ‘बंटी और बबली 2’ या सिनेमात सैफ अली खानसोबत दिसणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
–आनंदाची बातमी! अभिनेत्री नयनताराने केली साखरपुड्याची पुष्टी; जाणून घ्या कोण आहे तो नशीबवान?
–सोनू अभिनेत्रीसोबत करत होता ‘तुम तो ठहरे परदेसी’ गाण्यावर डान्स; मध्येच आला चाहता आणि…
–मालदिवला नवऱ्यासोबत सुट्यांसाठी जात सना खानने एअरपोर्टवरच अदा केला नमाज; इंटरनेटवर व्हिडिओ व्हायरल