Tuesday, July 9, 2024

‘माझा आवाज एवढा…’ राणी मुखर्जीने केले तिला आवाजावरून ट्रोल करणाऱ्या लोकांवर भाष्य

बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जीला बॉलिवूडमध्ये तब्बल 25 वर्ष पूर्ण झाले आहे. तिने तिच्या या मोठ्या करियरमध्ये अनेक सुपरहिट सिनेमे दिले. ‘राजा की आएगी बारात’ सिनेमातून आपल्या कारकिर्दीला सुरुवात करणारी राणी 2000 च्या दशकात टॉपची अभिनेत्री म्हणून ओळखली जायची. उत्तम अभिनय, उत्तम डान्स, सुंदरता आदी सर्वच गोष्टी तिच्यामध्ये आहेत. मात्र असे असूनही राणीला तिच्या आवाजामुळे आणि तिच्या उंचीमुळे सतत लोकांकडून अनेक गोष्टी ऐकाव्या लागल्या.

rani mukharjee
Photo Courtesy: Instagram/ ranimukharji_official

सध्या राणी मुखर्जी तिच्या आगामी ‘मिसेज चटर्जी बनाम नॉर्वे’ या सिनेमासाठी तुफान चर्चेत आली आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून, त्याला प्रेक्षकांनी दमदार प्रतिसाद दिला आहे. सध्या ती या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असून, याच दरम्यान तिने एक मुलाखत दिली, ज्यात तिने तिच्या संघर्षाच्या दिवसांना उजाळा दिला. यावेळी ती म्हणाली, ” मी जर लोकांचे म्हणणे ऐकले असते तर आज जे लाखो लोकं माझ्या आवाजावर माझ्या एवढेच प्रेम करतात त्यांच्यापर्यंत मी पोहोचलेच नसते. आज मला माझ्या खास वेगळ्या आवाजासाठी ओळखलं जातं. माझा आवाज एवढा खास आणि लोकप्रिय बनेल याची कुणीही कल्पना केली नव्हती.”

तत्पूर्वी राणीने ‘कुछ कुछ होता है’, ‘साथीया’, ‘बंटी और बबली’, ‘मर्दानी’, ‘हीचकी’, ‘हम तुम’, ‘युवा’, ‘दिल बोले हाडिप्पा’, ‘ब्लॅक’ आदी अनेक चित्रपटांमध्ये उत्तमोत्तम भूमिका साकारल्या होत्या. राणीचा आगामी ‘मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे’ हा चित्रपट 17 मार्च रोजी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात राणी मुखर्जीबरोबर अनिर्बन भट्टाचार्य, जिम सरभ आणि नीना गुप्ता यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन आशिमा छिब्बर यांनी केले आहे. (rani mukerji on people pulling her down for her voice)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
हेमा मालिनी यांनी वयाच्या 74व्या वर्षी केला बॅले डान्स, परफॉर्मन्स पाहून चाहते थक्क

माधुरी दीक्षितसमोर कमीपणा येऊ नये म्हणून अभिनेते संजय कपूर करायचे ‘हे’ काम, अनेक वर्षांनी केला खुलासा

हे देखील वाचा