Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

खलनायकाची भूमिका साकारल्यामुळे पालकांनी काढले घराबाहेर, असा आहे रणजित यांचा सिनेसृष्टीतील रंजक प्रवास

बॉलिवूडमध्ये अनेक कलाकारांनी खलनायकाची भूमिका निभावून नाव कमावले आहे. नायकाच्या भूमिकेत काम करून नावारूपाला येणे अगदी सोप्पे आहे परंतु खलनायकाच्या भूमिकेत काम करून नावारूपाला येणे खूप अवघड गोष्ट आहे. असेच खलनायकाच्या अनेक भूमिका साकारून ज्यांनी प्रेक्षकांना अगदी घाबरून सोडले होते, ते म्हणजेच अभिनेते रणजित. एक काळ असा होता त्याचे चित्रपट पाहून प्रेक्षकांना भीती वाटत असायची. त्यांचा हा खराखुरा अभिनय पाहून लोकांना ते वैयक्तिक आयुष्यात देखील खलनायक वाटत होते. यामुळे त्यांच्या आयुष्यात अनेक मजेशीर किस्से घडले आहे. रणजित शुक्रवारी (१२ नोव्हेंबर) त्यांचा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्त जाणून घेऊया त्यांच्या आयुष्यातील काही खास किस्से.

रणजित यांचा जन्म १२ नोव्हेंबर १९४६ रोजी पंजाबमधील अमृतसर येथे झाला. भारतीय वायुसेनाची ट्रेनिंग सोडून त्यांना एका पार्टीमध्ये चित्रपटात काम करण्याची ऑफर मिळाली. त्यांचे असे म्हणणे होते की, चित्रपटात अभिनेत्री खलनायक म्हणून त्यांनाच घेत होत्या. त्यामुळे अनेक चित्रपटात त्यांनी खलनायकाची भूमिका साकारली आहे. (Ranjeet birthday special : when ranjeet wife relatives warn her before marrying the actor)

रणजित यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, “जेव्हा मी ‘शर्मीली’ या चित्रपटात नकारात्मक पात्र निभावले होते तेव्हा मला घरातून बाहेर काढले होते. माझ्या पालकांना असे वाटले होते की, मी कोणते तरी फालतू काम करत आहे, जिथे मुलींना त्रास होतो आणि मी त्यांच्यासोबत काही चुकीच्या गोष्टी करतो.”

तसेच जेव्हा रणजित यांचे लग्न ठरले होते. तेव्हा मुलीच्या घरच्यांनी रणजित यांच्यासोबत लग्न करण्यास नकार दिला होता. रणजित यांनी सांगितले की, “जेव्हा माझी लग्न होणार होते, तेव्हा माझ्या पत्नीच्या नातेवाईकांनी माझ्या सासूला सांगितले की, रणजितसोबत लग्न करण्याऐवजी तुम्ही मुलीला विष द्या.”एवढंच नाही तर रणजित यांनी सांगितले की, कहर तर तेव्हा झाला जेव्हा तिच्या नातेवाईकांनी मुलीच्या आईला हे सांगितले की, मुलीला तपासा तिच्या अंगावर मारल्याचे काही घाव तर नाही ना.

रणजित यांनी जवळपास ४०० चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारली आहे. या आधी ‘हाऊसफुल ४’ या चित्रपटात दिसले होते. या चित्रपटात त्यांच्यासोबत अक्षय कुमार, रितेश देशमुख, यांसारखे कलाकार होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा