Sunday, June 8, 2025
Home बॉलीवूड तैमूर खान असणार रणवीर सिंगचा म्हातारपणाचा आधार? रणवीरच्या वक्तव्याने चाहते संभ्रमित

तैमूर खान असणार रणवीर सिंगचा म्हातारपणाचा आधार? रणवीरच्या वक्तव्याने चाहते संभ्रमित

अभिनेता रणवीर सिंग (ranveer singh)हा बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता आहे. त्याचे चित्रपट देखील त्याच्या चाहत्यांना खूप आवडतात. अशातच रणवीर सिंगने त्याच्या एका मुलाखतीत खळबळजनक वक्तव्य केले आहे. रणवीर सिंगला जेव्हा एका जुन्या मुलाखतीत विचारण्यात आले की, त्याला कोणत्या बॉलिवूड खानसोबत काम करायला आवडेल, तेव्हा त्याच्या उत्तराने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. त्याने शाहरुख खान, सलमान खान, आमिर खान किंवा सैफ अली खान यांचे नाव न घेता, तैमूर अली खानचे (taimur ali khan) नाव घेतले. रणवीरने तैमूरला म्हातारपणाचा आधारही सांगितला.

तैमूर हा करीना कपूर खान (kareena kapoor khan) आणि सैफ अली खान (saif ali khan) यांचा मोठा मुलगा आहे, ज्याचा जन्म २०१६ मध्ये झाला आहे. गेल्या वर्षी, या जोडप्याने त्यांच्या दुसऱ्या मुलाचे, जेह अली खानचे स्वागत केले. जेव्हा रणवीरला त्याच्या बॉलिवूडमधील आवडत्या खानबद्दल विचारण्यात आले तेव्हा त्याने तैमूरचे नाव घेतले.

तो पुढे म्हणाला, “माझ्या म्हातारपणाचा तो आधार आहे. त्याने चांगले काम करावे, भरपूर चित्रपट करावेत आणि त्याच्या प्रत्येक चित्रपटात मी त्याच्या वडिलांची भूमिका करणार आहे.” रणवीर शेवटचा ‘जयेशभाई जोरदार’मध्ये दिसला होता. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने अपेक्षेप्रमाणे कामगिरी केली नाही. यापूर्वी, तो स्पोर्ट्स-ड्रामा ‘८३’ मध्ये दिसला होता, ज्यामध्ये त्याची पत्नी दीपिका पदुकोण देखील होती.

रणवीर सिंग त्याच्या आगामी ‘रॉकी और राणी की प्रेम कहाणी’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यसोबत आलिया भट्ट देखील असणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

‘काय लहान बाळासारखं रडतंय’, खिलाडी बनायला निघालेल्या निशांतच्या व्हिडिओवर नेटकऱ्याची लक्षवेधी कमेंट

चक्क भर रस्त्यातच दगडूने धरला ठेका, पाहा नक्की काय झालं

विठ्ठल भक्तीत हरपलं ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ फेम अश्विनी महांगडेचं देहभान, वारकऱ्यांबरोबरचा व्हिडिओ व्हायरल

हे देखील वाचा