Sunday, February 23, 2025
Home कॅलेंडर रणवीर सिंगने शोधली छोटी दीपिका, व्हिडिओ शेअर करून केले भरभरून कौतुक

रणवीर सिंगने शोधली छोटी दीपिका, व्हिडिओ शेअर करून केले भरभरून कौतुक

बॉलिवूडची बाजीराव आणि मस्तानी म्हणून उल्लेख केली जाणारी जोडी म्हणजे रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण. दोघांच्या लग्नाची, त्यांच्या प्रेमाची सर्वत्र चर्चा होत असते. दीपिका आणि रणवीर दोघेही हिंदी चित्रपट जगतात दिग्गज कलाकार म्हणून ओळखले जातात. त्यांच्या फोटोंची नेहमीच सोशल मीडियावर चर्चा होत असते. आता अभिनेता रणवीर सिंगने टाकलेल्या एका व्हिडिओची जोरदार चर्चा होत आहे. कारण रणवीर सिंगने दीपिका पदुकोणची नक्कल करणारी छोटी मुलगी शोधली असून ती दीपिकाची मिनी व्हर्जन असल्याचेही म्हटले आहे.

अभिनेता रणवीर सिंग (Ranveer singh) त्याच्या मजेशीर स्वभावामुळे नेहमीच माध्यमांत चर्चेचा विषय असतो. त्याच्या ड्रेसिंगचे तर अनेक फोटो व्हायरल होत असतात. ज्यामध्ये त्याच्या हटके स्टाइलची चर्चा होताना दिसत असते. सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असणारा अभिनेता रणवीर सिंगने नुकताच एक व्हिडिओ आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. ज्यामध्ये एक मुलगी अभिनेत्री दीपिका पदुकोणची नक्कल करताना दिसत आहे. रणवीर सिंगने हा व्हिडिओ पोस्ट करत “लीला सारखे कोणीच नाही, दीपिका बघ ही तुझी मिनी व्हर्जन आहे, हिच्या एक्स्प्रेशन्स खूप आवडल्या,” असा भन्नाट कॅप्शन दिला आहे. रणवीर सिंगचा हा व्हिडिओ चाहत्यांना खूपच आवडला असून त्याच्यावर जोरदार प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे. यावर एका नेटकऱ्याने “विश्वास बसत नाही,” अशी प्रतिक्रिया दिली आहे, तर आणखी एका युजरने, “खरच जोरदार अभिनय केला आहे,” असे म्हणत मुलीचे कौतुक केले आहे.

रणवीर सिंग सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेता म्हणून ओळखला जातो. नुकताच तो ’83’ चित्रपटात झळकला होता. हा चित्रपट भारतीय क्रिकेट संघाने जिंकलेल्या 1983 च्या विश्वचषकावर आधारित आहे. चित्रपटामध्ये रणवीर सिंगने कपिलदेवची भूमिका साकारली होती. अभिनेत्री दीपिका पदुकोणने सुद्धा या चित्रपटात भूमिका साकारली होती. दोघांची जोडी नेहमीच चर्चेत असते. त्याचबरोबर अभिनेत्री दीपिका पदुकोणसुद्धा तिच्या आगामी ‘गेहराइयां’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. चित्रपटात दीपिका पदुकोणसोबत अनन्या पांडे, सिद्धांत चतुर्वेदी, धैर्य कारवा असे दिग्गज कलाकार झळकणार आहेत.

हेही वाचा :

हे देखील वाचा