Wednesday, April 30, 2025
Home अन्य आलिया भट्टनंतर दीपिका पदुकोणही देणार गुड न्यूज? रणवीर सिंगने केला महत्वाचा खुलासा

आलिया भट्टनंतर दीपिका पदुकोणही देणार गुड न्यूज? रणवीर सिंगने केला महत्वाचा खुलासा

बॉलिवूड जगतात सध्या आलिया भट्टने (Alia Bhatt) दिलेल्या गुड न्यूजचीच सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे. आलिया रणबीरने दिलेल्या गुड न्यूज नंतर आता अभिनेत्री दीपिका पदुकोणच्याही (Deepika Padukone) नावाचा या यादीत समाविष्ठ होण्याची शक्यता आहे.  अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh) आणि दीपिका पदुकोण हे बॉलिवूडमधील आदर्श जोडप्यांपैकी एक आहेत.त्यांच्या लग्नाला जवळपास चार वर्षे झाली आहेत. दोघेही लवकरच काहीतरी गुड न्यूज देतील याची त्यांचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. कदाचित आता त्यांची प्रतीक्षा संपणार आहे. दोघंही आपलं कुटुंब वाढवण्याच्या तयारीत असल्याची चर्चा फिल्मी जगतात सुरू आहे. त्याचवेळी रणवीर सिंगनेही अलिकडेच याबद्दल खुलासा केला आहे. 

अलीकडेच एका मुलाखतीत रणवीर सिंगने बाबा होण्याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. एवढेच नाही तर दीपिका पदुकोणची मातृभाषा असलेल्या कोकणी भाषा तो आपल्या मुलांसाठी शिकत असल्याचेही त्याने सांगितले. अखेर, रणवीरने लहान मुलांसाठी कोकणी भाषा का शिकण्याची गरज आहे, याचे कारणही सांगितले. “मी अशा स्थितीत आहे जिथे मला कोकणी भाषा कमीत कमी समजते. पण, आम्हाला मुलं असताना आणि मला समजत नसताना त्यांच्या आईने त्यांच्याशी कोकणीत बोलावं असं मला वाटत नाही, अशी प्रतिक्रिया त्याने याबद्दल दिली आहे.

यावर प्रतिक्रिया देताना दीपिका पदुकोण म्हणाली की, “रणवीरच्या निर्णयाने मी खूप खूश आहे. जोपर्यंत तिला याचे खरे कारण कळले नाही तोपर्यंत तिने हा आपला चांगला प्रयत्न असल्याचे मानले.” रणवीर आणि दीपिका नुकतेच कॅलिफोर्नियातील सॅन जोस येथे एका एनआरआय संमेलनात सहभागी झाले होते. तेथील कोकणी समाजाने ही परिषद आयोजित केली होती. यादरम्यान रणवीर-दीपिकाने अनेक रंजक गोष्टी शेअर केल्या, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

कामाबद्दल बोलायचे झाले तर रणवीरकडे सध्या अनेक चित्रपट आहेत. सध्या तो रोहित शेट्टीच्या ‘सर्कस’मध्ये बिझी आहे. यामध्ये त्याच्यासोबत पूजा हेगडे आणि जॅकलिन फर्नांडिस दिसणार आहेत. याशिवाय तो करण जोहरच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’मध्ये दिसणार आहे, ज्यामध्ये तो आलिया भट्टसोबत स्क्रीन शेअर करणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

‘असे तयार होतात चविष्ट ‘संजय राऊत’ अभिनेते किरण मानेंनी थेट रेसिपीच सांगितली, पोस्ट होतेय व्हायरल

‘काली’ चित्रपटाच्या पोस्टरवरून झालेल्या गदारोळावर नुसरत जहाँचे वक्तव्य; म्हणाली, ‘कोणत्याही परिस्थितीत…’

‘लाळ टपकेपर्यंत पान खाणे अन् धोतरवर…’, किशोर कुमारांच्या अटी ऐकून हादरले बीआर चोप्रा

 

हे देखील वाचा