Tuesday, May 28, 2024

पहिल्यांदाच नकारात्मक भूमिकेत दिसणार रणवीर सिंग, राक्षस चित्रपटात साकारणार महत्वाची भूमिका

2024 हे वर्ष रणवीर सिंगसाठी (Ranveer singh) खूप चांगले ठरत आहे. तो सातत्याने अनेक चित्रपट साइन करत आहे. या अभिनेत्याकडे आधीच दिग्दर्शक फरहान अख्तरचा बहुप्रतिक्षित ‘डॉन 3’ चित्रपट आहे. याशिवाय रणवीरकडे दिग्दर्शक शेट्टीचा कॉप युनिव्हर्सचा मेगा बजेट चित्रपट ‘सिंघम अगेन’ देखील आहे. आता रणवीर सिंगने आणखी एक चित्रपट साईन केला आहे. रणवीर आता दिग्दर्शक प्रशांत वर्मा यांच्या ‘राक्षस’ या चित्रपटात दिसणार आहे.

रणवीर त्याच्या चित्रपटांच्या अपडेट्समुळे सतत चर्चेत असतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रणवीर सिंग लवकरच साऊथच्या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. यासाठी रणवीरने गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘हनुमान’ चित्रपटाचे दिग्दर्शक प्रशांत वर्मा यांच्याशी हातमिळवणी केली आहे. त्यांचा हा चित्रपट सुपर डुपर हिट ठरला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्रशांतला अभिनेत्याचे काम खूप आवडते. ‘राक्षस’ चित्रपटाबाबत प्रशांत आणि रणवीर सतत भेटत होते. भेटीदरम्यान प्रशांतने रणवीरला चित्रपटाची कथा सांगितली आणि त्याला ती खूप आवडली. रणवीरने प्रशांतसोबत डील फायनल केली आहे. सध्या या चित्रपटाचे नाव ‘राक्षस’ असे ठेवण्यात आले आहे.

‘राक्षस’ चित्रपटात रणवीरशिवाय इतर कोणत्याही स्टारला अप्रोच करण्यात आलेले नाही. हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार यावर सध्या तरी पडदा पडला नाही. ‘राक्षस’ हा स्वातंत्र्यपूर्व काळातील पौराणिक पार्श्वभूमीवर आधारित पिरियड फिल्म असल्याचे म्हटले जाते. चित्रपटातील रणवीरचे पात्र नकारात्मक असू शकते.

रणबीर शेवटचा ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटात दिसला होता. या चित्रपटातील त्याची आलिया भट्टसोबतची जोडी चाहत्यांना खूप आवडली होती. या चित्रपटाशिवाय रणवीर दिग्दर्शक आदित्य धर यांच्या अनामित चित्रपटातही दिसणार आहे. सध्या या चित्रपटाच्या प्री-प्रॉडक्शनचे काम सुरू आहे. मात्र, रणवीर सिंग दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या ‘सिंघम अगेन’ या चित्रपटात दिसणार आहे. तसेच, रणवीर लवकरच दिग्दर्शक फरहान अख्तरच्या ‘डॉन 3’ चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

‘या’ चित्रपटातून इब्राहिम अली खान करणार पदार्पण, लवकरच सोशल मीडियावर करणार घोषणा
तापसीला तिच्या यशाचा अभिमान; म्हणाली, ‘मी आज ज्या ठिकाणी आहे ती केवळ माझ्या मेहनतीमुळे’

हे देखील वाचा