बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग त्याच्या हटके आणि देसी लूकमुळे सतत चर्चेत असतो. सध्या टीव्हीवर रणवीर ‘द बिग पिक्चर’ नावाचा कार्यक्रम करत आहे. या कार्यक्रमात त्याने एका सहभागी स्पर्धकाशी बोलताना काट्याच्या चमच्यापेक्षा हाताने खायलाच मजा येते, असे वक्तव्य केल्याने रणवीर सिंगचा देसी अंदाज पुन्हा एकदा चाहत्यांना पाहायला मिळाला आहे.
याबाबत संपूर्ण माहिती अशी की, रणवीर सिंग सध्या टीव्हीवर ‘द बिग पिक्चर’ नावाचा कार्यक्रम करत आहे. आपल्या मिश्किल बोलण्याने आणि संवादाने रणवीर सिंगचा हा कार्यक्रम चांगलाच चर्चेत आला आहे. याचवेळी कार्यक्रमाच्या एका भागात सहभागी स्पर्धक आणि रणवीर यांच्यातील संवादाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
त्याचे झाले असे की, स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकाने 10 हजार रुपये जिंकले होते. त्यावेळी रणवीर सिंगने या पैशाचे काय करणार आहेस? असा प्रश्न तिला विचारला. याबद्दल बोलताना स्पर्धकाने सांगितले की, “घरच्यांना घेऊन एखाद्या मोठ्या हॉटेलमध्ये जेवायला जाणार आहे, जिथे काट्याच्या चमच्याने चाकूने खाल्ले जाते.” हे ऐकून रणवीर त्याचा स्वतःचा अनुभव शेअर करताना सांगतो की, “काट्याच्या चमच्याने खाणे खूपच ओव्हररेटेड आहे. जी चव हाताने खाण्यात आहे, ती काट्याच्या चमच्याने किंवा सुरीने खाण्यात येत नाही.”
रणवीर सिंगच्या या साधेपणाचे सर्व चाहत्यांनी कौतुक केले आहे. यापूर्वीही अनेकदा चाहत्यांना रणवीरच्या साधेपणाचे दर्शन झाले आहे. कितीही मोठा स्टार असला, तरी रणवीर आपल्या चाहत्यांना कधीच विसरत नाही. चाहत्यांशी सेल्फी काढायला सुद्धा तो नेहमी तयार असतो.
याच कार्यक्रमात एका स्पर्धकाची कौटुंबिक परिस्थिती आणि पार्श्वभूमी जाणून घेताना रणवीर सिंग खूपच भावुक झाला होता. यावेळी त्याला अश्रू अनावर झाले होते. रणवीरच्या या हळव्या रुपाचे चाहत्यांना पहिल्यांदाच दर्शन झाले होते. यावेळी रणवीरने मनाचा मोठेपणा दाखवत त्या मुलाच्या कुटुंबीयांशी व्हिडिओ कॉल करून चर्चा सुद्धा केली होती.
दरम्यान, रणवीरचे अनेक चित्रपट सध्या प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्यामध्ये ’83,’ सर्कस’, ‘रॉकी और रानी की प्रेम कहाणी,’ ‘सुर्यवंशी’ आणि’ जयेशभाई जोरदार’ अशा धमाकेदार चित्रपटांचा समावेश आहे. ‘सूर्यवंशी’ चित्रपटात अक्षय कुमार आणि कॅटरिना कैफ यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 21 ऑक्टोबरपासून या चित्रपटाच्या प्रमोशनला सुरुवात होत आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-Video: जिनिलियासमोर ‘साथ निभाना साथिया’ फेम ‘गोपी बहू’ भावुक, अश्रूही झाले अनावर
-अक्षय कुमारचा ‘सूर्यवंशी’ दिवाळीत करणार धमाका; चित्रपटातील पहिल्या गाण्याचा टिझर रिलीझ