व्वा! घटस्फोटानंतर बिनधास्त लूकमध्ये दिसली अभिनेत्री समंथा; बेस्ट फ्रेंडसोबतचा मजेशीर व्हिडिओ केला शेअर

दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा रुथ प्रभू हिने नुकतेच काही दिवसांपूर्वी तिच्या घटस्फोटाची बातमी दिली होती. तेव्हापासून ती खूपच चर्चेत आहे. या निर्णयानंतर ती तिच्या आयुष्यात पुढे गेली आहे. अशातच तिने तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर रिपोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये ती तिच्या मित्रांसोबत रस्सीखेच खेळताना दिसत आहे. हा व्हिडिओ समंथाच्या आधी तिची मैत्रीण फॅशन डिझायनर आणि मॉडेल शिल्पा रेड्डीने सोशल मीडियावर शेअर केला होता. ज्यामध्ये त्या मस्ती करताना दिसत आहेत.

शिल्पानंतर आता समंथाने देखील हा मजेशीर व्हिडिओ इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करून तिने लिहिले आहे की, “सुंदर, वेडेपणा, मस्ती आणि समाधानाने भरलेला आठवडा, जो प्रत्येक क्षण माझ्या बेस्टिजसोबत गेला आहे.” शिल्पाने या व्हिडिओसोबत समंथासोबत गेट टूगेदरचे काही फोटो देखील शेअर केले होते. (Samantha Ruth Prabhu shares funny video with best friends on social media)

तिने शेअर केलेला हा व्हिडिओ तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. अनेकजण तिच्या या व्हिडिओवर कमेंट करत आहेत. घटस्फोटाच्या बातमीने तिचे चाहते काहीशा प्रमाणात नाराज झाले होते, परंतु तिचा हा मजेशीर व्हिडिओ पाहून सगळेच खुश झाले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Samantha (@samantharuthprabhuoffl)

समंथाच्या वैयक्तिक आयुष्याबाबत बोलायचे झाल्यास, तिने २००७ साली नागा चैतन्यसोबत लग्न केले होते. मात्र, त्यांच्या नात्यात काही दिवसातच कटुता निर्माण झाली. ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला तिने तिच्या घटस्फोटाची घोषणा केली होती. तिने सोशल मीडियावर ही बातमी दिली होती. तिने सोशल मीडियावर लिहिले होते की, “माझ्या सगळ्या शुभचिंतकांसाठी, खूप विचार केल्यानंतर आम्ही आमचे मार्ग केले आहे. मात्र, मैत्रीच्या ज्या नात्याला आम्ही मानतो, ते खास नाते आमच्यात नेहमीच राहणार आहे.”

समंथाच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, समंथा या आधी शेवटची ‘शकुंतलम’मध्ये दिसली होती. या आधी तिने ‘फॅमिली मॅन २’ या वेबसीरिजमध्ये डिजिटल डेब्यू केला होता. तिच्या या वेबसीरिजमधील पात्राचे खूप कौतुक झाले.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-आर्यनच्या अटकेवर प्रसिद्ध निर्मात्यांनी व्यक्त केले दु:ख; म्हणाले, ‘बिचारा मुलगा खूप…’

-अमृता राव आणि आरजे अनमोल पहिल्यांदाच शेअर करणार त्यांची ‘विवाह’पर्यंत पोहचलेली अनोखी प्रेमकहाणी

-क्या अंदाज हैं! रोहनप्रीतच्या गळ्यावर चाकू ठेऊन नेहा कक्करने हटके अंदाजात केले प्री एनिवर्सरी सेलिब्रेशन

Latest Post