बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh) सध्या त्याच्या आगामी ‘जयेशभाई जोरदार’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. रणवीर हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात उतरवण्यासाठी कोणतीही कसर सोडत नाहीये आणि यामुळेच चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये खूप व्यस्त आहे. नुकतेच प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्याने आपले जुने दिवस आठवले.
एका कार्यक्रमादरम्यान, रणवीर सिंगने त्याच्या करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांची आठवण काढली, जेव्हा त्याला सांगण्यात आले होते की तो हिरोसारखा दिसत नाही. रणवीर सिंग म्हणतो, “माझा पहिला चित्रपट रिलीझ होण्यापूर्वी सगळीकडे माझे पोस्टर्स लावण्यात आले होते. मी एक चित्रपट पाहायला गेलो, तिथे मला माझ्या पोस्टरसमोर दोन लोक उभे असलेले दिसले. मी थांबलो, कारण ते काय बोलतात हे मला ऐकायचे होते. ते म्हणाले, हा कोण आहे? हा हिरोसारखा स्मार्ट दिसत नाही! हे त्यावेळी मी त्याच्याकडून ऐकले होते.” (ranveer singh once told by aditya chopra he is not good looking like hrithik roshan)
पुढे रणवीरने सांगितले, “इतकेच नाही, तर चित्रपट निर्माते आदित्य चोप्रानेही एकदा एका भेटीत मला सांगितले होते की, ‘तू ऋतिक रोशनसारखा स्मार्ट नाहीयेस, तर तुला तुझ्या अभिनयावर लक्ष केंद्रित करावे लागेल.’ मी त्यांना म्हणालो, ठीक आहे सर, मी माझे सर्वोत्तम देईन.” एक तो काळ होता आणि एक आजचा आहे, जेव्हा रणवीरने खरोखरच आपण एक उत्तम नायक असल्याचे सिद्ध केले आहे. आपल्या अभिनयामुळे तो गेली ११ वर्षे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. त्याने आतापर्यंत बॉलिवूडला ‘बाजीराव मस्तानी’, ‘पद्मावत’, ‘सिम्बा’, ‘गोलियों की रासलीला: राम लीला’ आणि ‘८३’ सारखे हिट चित्रपट दिले आहेत.
आदित्य चोप्रानेच ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून रणवीर सिंगला पडद्यावर आणले. ‘जयेशभाई जोरदार’ या चित्रपटाची निर्मितीही आदित्य चोप्रानेच केली आहे. या चित्रपटात रणवीर सिंग एका गुजराती माणसाच्या भूमिकेत दिसणार आहे, ज्याचे लग्न शालिनी पांडेसोबत झाले आहे आणि तो एका मुलीचा बाप आहे. चित्रपटाची कथा स्त्री-पुरुष समानतेभोवती फिरते. या चित्रपटात बोमन इराणीने (Boman Irani) रणवीरच्या वडिलांची भूमिका केली असून, अभिनेत्री रत्ना पाठक शाह (Ratna Pathak Shah) त्याची आई आहे. हा चित्रपट १३ मे रोजी थिएटरमध्ये रिलीझ होणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा