अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh) नुकताच एका लग्नात सहभागी होण्यासाठी दिल्लीत पोहोचला होता. सूट-बूट घालून, रणवीर सिंगने आपल्या दमदार डान्स मूव्ह्सने स्टेजवर आग लावली, जे पाहून सर्वजण थक्क झाले. या लग्नात रणवीर सिंगचे डान्स करतानाचे काही व्हिडिओ व्हायरल होत आहेत, जे पाहून चाहतेही वेडे झाले आहेत.
At a wedding last night in delhi ???????? @RanveerOfficial pic.twitter.com/h85mVKsopj
— ???????????????????????? ???? (@silvermist_RS) April 10, 2022
या लग्नात रणवीर सिंगने ‘मल्हारी’ आणि ‘गल्ला गुडियां’ सारख्या अनेक हिट गाण्यांवर जबरदस्त डान्स केला. इतकेच नाही, तर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘आरआरआर’ या चित्रपटातील ‘नाटो नाटो’ गाण्यावरही रणवीर सिंगने जोरदार ठुमके लावलेले पाहायला मिळाले. रणवीर सिंगने वधूपासून ते सर्व पाहुण्यांसोबत भरपूर डान्स करून सर्वांची मनं जिंकली. (ranveer singh steals the show with his dance at delhi wedding)
So hot pleaseee❤️????❤️???? @RanveerOfficialpic.twitter.com/582vo6eQLd
— ritika (@ranveerfangirl) April 10, 2022
‘जयेशभाई जोरदार’ची प्रतीक्षा
रणवीर सिंगच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर अभिनेता लवकरच ‘जयेशभाई जोरदार’ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तो एका गुजराती माणसाच्या भूमिकेत आहे, जो समाजातील पुरुषप्रधान विचारसरणीविरोधात आवाज उठवतो. रणवीर सिंगने सांगितले होते की, जेव्हा त्याने पहिल्यांदा ‘जयेशभाई जोरदार’ची कथा ऐकली, तेव्हा तो खूप हसला होता आणि खूप रडलाही होता.
समोर आलेल्या माहितीनुसार, या चित्रपटासाठी मनिष शर्मा यांनी अनेक दिग्गज दिग्दर्शकांना एकत्रित केले आहे. ज्यामध्ये अनेक दमदार चित्रपटांची निर्मिती केलेल्या आदित्य चोप्रा सारख्या अनेक उमद्या लोकांचा समावेश आहे. तर रणवीर सिंगच्या अभिनयाने या चित्रपटाला आणखीनच लोकप्रियता मिळणार आहे. अशा प्रकारचा पहिलाच प्रयोग प्रेक्षकांना पाहायला मिळणार असल्याचेही मत अनेकांनी व्यक्त केले आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरची अनोखी संकल्पना त्यांनी मांडली आहे. यामधून त्यांनी आपला संदेश लोकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे.
‘या’ दिवशी रिलीझ होणार चित्रपट
रणवीरला नुकतेच एका कार्यक्रमात स्पॉट करण्यात आले. तेव्हा ‘जयेशभाई जोरदार’बद्दल विचारले असता तो म्हणाला की, “हा चित्रपट तुम्हाला नक्कीच रडवेल. जर असे झाले नाही, तर पैसे परत केले जातील.” ‘जयेशभाई जोरदार’ १३ मे रोजी रिलीझ होणार आहे. दिव्यांग ठक्कर दिग्दर्शित हा एक सामाजिक विनोदी ड्रामा आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा