Sunday, August 3, 2025
Home बॉलीवूड रणवीर सिंगवरील प्रेम व्यक्त करण्यासाठी चक्क एका पठ्याने केले ‘हे’ काम, पाहून अभिनेता देखील झाला भावुक

रणवीर सिंगवरील प्रेम व्यक्त करण्यासाठी चक्क एका पठ्याने केले ‘हे’ काम, पाहून अभिनेता देखील झाला भावुक

कलाकारांबद्दल फॅन्सचे असलेले वेडे प्रेम अनेकदा लोकांसमोर येत असते. आपल्या आवडत्या कलाकारांबद्दल फॅन्स त्यांचे प्रेम वेगवेगळ्या पद्धतीने दाखवतात. कलाकारांची भेट घेण्यासाठी त्यांच्या शूटिंगच्या सेटवर, घराबाहेर पोहचतात. सोशल मीडियावर त्यांना फॉलो करतात, मेसेज करतात आदी विविध प्रकारे ते त्यांचे प्रेम व्यक्त करताना दिसतात. मात्र काही तर यापेक्षाही पुढे असतात. आपल्या आवडत्या कलाकाराच्या आवडीनिवडी जाणून घेत त्यावर आधारित व्यवसाय करतात. हॉटेल काढून आपल्या आवडत्या कलाकारांच्या आवडीनुसार डिशेश ठेवतात. काही तर त्यांच्या घरात, वाहनात आवडत्या कलाकाराचे फोटो लावतात. मात्र आता असा एक फॅन समोर आला आहे, ज्याने त्याच्या आवडत्या कलाकाराचा चेहरा पाठीवर तयार केला आहे. हा फॅन आहे अभिनेता रणवीर सिंगचा.

रणवीर सिंग हा त्याच्या तुफान ऊर्जेसाठी ओळखला जातो. सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणावर सक्रिय असलेला रणवीर नेहमीच या ना त्या कारणामुळे मीडियामध्ये आणि फॅन्समध्ये गाजत असतो. आपल्या चित्रपटांमुळे, प्रभावी अभिनयामुळे आणि अतरंगी कपड्यांमुळे तो सतत चर्चेत असतो. सध्या रणवीरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये देखील त्याचा एक हटके आणि विचित्र ड्रेसिंग सेन्स पाहायला मिळत असला तरी हा व्हिडिओ सर्वांचे लक्ष वेधून घेण्याचे अजून एक कारण म्हणजे या व्हिडिओमध्ये रणवीर सिंगला त्याचा एक फॅन भेटला आणि तो त्याच्याशी बोलताना दिसत आहे.

रणवीर फोटोग्राफरला पोझ देत असताना अचानक तो एका फॅनला बघतो आणि त्याच्याजवळ जातो. तो फॅन लगेचच त्याचा शर्ट काढतो आणि त्याची पाठ रणवीरला दाखवतो. त्याची पाठ पाहून तिथे असणारे सर्वच लोकं हैराण होतात. त्याच्या पाठीवर रणवीरच्या वेगवेगळ्या एक्सप्रेशनमधले चेहरे टॅटूच्या काढलेले दिसतात. रणवीर हे दुरून बघतो, आणि लगेच त्याच्या जवळ जातो आणि प्रमाणे त्याला मिठी मारतो. पुढे त्याच्याशी काही वेळ बोलतो. त्या फॅनसोबत रणवीरचे प्रेमळ वागणे पाहून सर्वच लोकं त्याचे कौतुक करताना दिसत आहे. हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत असून, त्यावर नेटकऱ्यांचा भरभरून कमेंट्स देखील येत आहे. रणवीरच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, तो लवकरच ‘जयेशभाई जोरदार’ आणि रोहित शेट्टीच्या ‘सर्कस’मध्ये दिसणार आहे.

हेही वाचा :

हे देखील वाचा