Thursday, April 24, 2025
Home बॉलीवूड वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या रणवीर सिंगने दाखवला संस्कारीपणा, शेकडोंमध्ये धरले ‘या ‘व्यक्तीचे पाय

वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या रणवीर सिंगने दाखवला संस्कारीपणा, शेकडोंमध्ये धरले ‘या ‘व्यक्तीचे पाय

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग (ranveer singh) सध्या चर्चेचा भाग आहे. नुकतेच त्याने कपड्यांशिवाय फोटोशूट केले आहे. त्यामुळे तो अडचणीत आला आहे. रणवीरविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या वादाच्या भोवऱ्यात त्याने शुक्रवारी दीपिका पदुकोणसोबत (deepika padukone) रॅम्प वॉक केला. डिझायनर मनीष मल्होत्राच्या (manish malhotra) मिजवान या फॅशन शोसाठी रणवीर-दीपिकाने रॅम्प वॉक केला. त्याच्या रॅम्प वॉकचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दरम्यान, रणवीरचा एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये तो आईच्या पाया पडताना दिसत आहे. त्यामुळे काहींनी त्याला आणखी एकदा ट्रोल केले आहे तर काहींनी त्याचे कौतुक केले आहे. त्यामुळे तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण या फॅशन शोचे स्टॉपर्स होते. गोल्डन लेहेंग्यात दीपिका खूपच सुंदर दिसत होती. तर दुसरीकडे रणवीरने काळ्या रंगाची शेरवानी परिधान केली होती. चाहते रणवीर आणि दीपिकाचे जोरदार कौतुक करत आहेत. दोघांची केमिस्ट्री पाहण्यासारखी होती. रॅम्प वॉकनंतर रणवीरच्या या हावभावाने सर्वांची मनं जिंकली आहेत.

रणवीरचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये तो रॅम्प वॉकनंतर प्रेक्षकांमध्ये बसलेल्या त्याच्या आईकडे येतो आणि तिच्या पायाला स्पर्श करतो. यानंतर तो त्याच्या बहिणीलाही भेटतो. रणवीरचा आईच्या चरणांचा स्पर्श चाहत्यांची मनं जिंकत आहे.

 

 

रणवीरचे हे हावभाव पाहिल्यानंतर यूजर्स त्याचे कौतुक करत आहेत. एका यूजरने लिहिले – “रणवीर एक अप्रतिम अभिनेता आणि चांगला माणूस आहे.” तर दुसऱ्याने लिहिले – “सुसंस्कृत पुत्र. युजरने लिहिले – “खुप सुसंस्कृत, काही दिवसांपूर्वी असाच एक सुसंस्कृत फोटो भावाने काढला होता.”

कामाच्या आघाडीवर, रणवीर शेवटचा ‘जयेशभाई जोरदार’ या चित्रपटात दिसला होता. तो लवकरच ‘रॉकी और राणीच्या प्रेमकहाणी’ आलिया भट्टसोबत दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन करण जोहरने केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

अजय देवगणसमोरच डायरेक्टरने केलेला सैफचा बाजार, एका चापटीत चारलेली धूळ

रणवीर सिंगच्या न्यूड फोटोवर श्रीजीता डेची प्रतिक्रिया; म्हणाली, ‘मी पण असंच करणार’

टायगर श्रॉफसोबत ब्रेकअप होताच दिशा पटानीने वाटले मीडियाला लाडू, व्हिडिओ पाहाच

हे देखील वाचा