Thursday, March 28, 2024

रणवीर सिंगच्या न्यूड फोटोवर श्रीजीता डेची प्रतिक्रिया; म्हणाली, ‘मी पण असंच करणार’

बॉलिवूडचा हँडसम हंक रणवीर सिंग (ranveer singh) त्याच्या विचित्र फॅशनमुळे अनेकदा चर्चेत असायचा, पण जेव्हा त्याने न्यूड फोटोशूट केले तेव्हा तो वादात सापडला. रणवीर सिंगच्या न्यूड फोटोशूटवरून सध्या खळबळ उडाली आहे. सोशल मीडियावर रणवीरवर टीकेची झोड उठत असतानाच त्याच्यावर एफआयआर दाखल करण्यात येत आहेत. मात्र, बॉलिवूडपासून टीव्ही इंडस्ट्रीपर्यंतचे अनेक स्टार्स त्याच्या समर्थनात उतरले आहेत. आता आणखी एका टीव्ही अभिनेत्रीने त्याला पाठिंबा दिला आहे.

‘तुम्ही हो बंधू सखा तुमही हो’ आणि ‘उतरण’ सारख्या शोमध्ये काम केलेली टीव्ही अभिनेत्री श्रीजीता डे (sreejita de) हिने नुकतीच रणवीर सिंगच्या न्यूड फोटोशूटवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. माध्यमांशी बोलताना श्रीजीताने म्हणते की, “एखाद्या महिला सुपरस्टारने असे बोल्ड फोटोशूट केले असते तर लोकांच्या प्रतिक्रिया कशा आल्या असत्या हे मला समजत नाही. मला एवढेच सांगायचे आहे की, असे करणे ही धाडसाची गोष्ट होती. हे स्वतःवर प्रेम करणे, स्वतःला प्रथम स्थान देणे आणि लोकांच्या निर्णयापासून स्वतःला दूर ठेवण्यासारखे आहे. ९० च्या दशकात शक्ती कपूर आणि जॅकी श्रॉफ यांनी असेच केले होते. त्याने जे काही केले ते प्रेरणादायी होते.”

न्यूड फोटोशूटमुळे संतप्त झालेल्या काही लोकांनी रणवीर सिंगविरोधात एफआयआर दाखल केली आहे. यावर अभिनेत्री म्हणाली, “मला समजत नाही की आपण स्वतःला इतरांच्या कामात इतके व्यस्त का ठेवतोय़ काही लोकांनी नग्नतेच्या आधारे अभिनेत्याविरुद्ध एफआयआर दाखल केल्याचे मी पाहिले. हे २०२२ आहे. तुमची शरीरयष्टी चांगली असेल, तुम्ही त्यात कम्फर्टेबल असाल आणि तुमच्यात हिम्मत असेल, तर का नाही! मी तेच करीन. ‘माझे जीवन… माझे नियम’ ही संकल्पना लोकांना का समजत नाही हे मला समजत नाही.” अशाप्रकारे तिने तिचे मत मांडले आहे. तिच्या या मताला अनेकांनी दुजोरा देखील दिला आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

टायगर श्रॉफसोबत ब्रेकअप होताच दिशा पटानीने वाटले मीडियाला लाडू, व्हिडिओ पाहाच

अगं बाबो ! आपल्या सात पिढ्या बसून खातील एवढा पैसे सलमान खान तर बिग बॉसमधून कमावतो

बॉलिवूडच्या ‘खलनायका’पासून कसा बनला तो सर्वसामान्यांचा ‘देवदूत’; वाचा खरा हिरो सोनू सूदचा प्रेरणादायी प्रवास

हे देखील वाचा