Thursday, June 1, 2023

बियर ग्रिल्ससोबत ‘जंगल में मंगल’ करताना दिसणार रणवीर सिंग, शोचा टीझर आला समोर

‘रणवीर Vs वाइल्ड विथ बेअर ग्रिल्स’ या साहसावर आधारित शोचा टीझर रिलीझ झाला आहे. टीझरमध्ये अस्वल रणवीर सिंगचा (Ranveer Singh) पाठलाग करताना दिसत आहे. तर त्याचवेळी तिथे साहसी रणवीर ग्रिल्ससोबत जगण्याची कला शिकत आहे. नेटफ्लिक्स इंडिया आणि रणवीर सिंगने त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एका पोस्टमध्ये व्हिडिओ शेअर केला आहे आणि लिहिले आहे की, “जंगल में मंगल! रणवीर Vs वाइल्ड, रोमांचकारी साहसांनी भरलेला एक इंटरॅक्टिव स्पेशल इज कमिंग सून.”

मजेदार आहे टीझर
व्हिडिओच्या सुरुवातीला रणवीरच्या चेहऱ्यावर एक भीती दिसत आहे. पुढील क्लिपमध्ये अस्वल त्याचा पाठलाग करत असल्याचे दिसते. त्याचवेळी, इंटरएक्टिव्ह स्पेशलमध्ये प्रेक्षकांना रणवीरसाठी काही ना काही निर्णय घेण्याची संधी मिळेल, असेही व्हिडिओमध्ये दाखवण्यात आले आहे. एका क्लिपमध्ये रणवीर मेल्याचे नाटक करताना दिसला, तर एका क्लिपमध्ये अस्वलाने फ्रेमच्या अर्ध्या भागात त्याची तपासणी केली आणि दुसऱ्यामध्ये डान्स केला. पुढच्या सीनमध्ये ग्रॅपलिंग गन आणि फ्लेअर यापैकी एक निवडण्याचा पर्याय दिला. तेव्हा रणवीर म्हणाला, “बटण दाबा आणि मला वाचवा.” (ranveer vs wild with bear grylls trailer)

व्हिडिओमध्ये झिपलाइनवर बेअर ग्रिल्सही दिसत आहे. जो म्हणतोय, “रणवीरला पूर्ण एडवेंचर मिळणार आहे.” रणवीरने त्याला जाताना बघताच तो म्हणाला, “अरे भाऊ, हा वेडा तर निघाला आम्ही कसं जाणार?.” यानंतर, तो स्वतः झिपलाइन वापरतो. शेवटच्या सीनमध्ये, तो त्याच्या शेजारी अस्वलासोबत डेड प्ले खेळताना दाखवला आहे.

ओटीटीमध्ये पदार्पण करणार आहे रणवीर
नेटफ्लिक्स स्पेशलमध्ये रणवीरचे ओटीटी पदार्पण देखील होईल. बेअर ग्रिल्ससोबत शोच्या शूटिंगसाठी जुलै २०२१ मध्ये तो सर्बियाला गेला होता. अभिनेता शेवटचा पडद्यावर ‘जयेशभाई जोरदार’मध्ये दिसला होता. त्याच्याकडे ‘सर्कस’ आणि ‘रॉकी और रानी की प्रेमकहानी’सह इतर अनेक प्रकल्प आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा