×

Jayeshbhai Jordar | प्रमोशनच्या नावाखाली ‘हे’ काय करू लागलाय रणवीर सिंग! पाहून तुमचेही चक्रावेल डोके

रणवीर सिंग (Ranveer Singh) आणि शालिनी पांडे (Shalini Panday) यांच्या ‘जयेशभाई जोरदार’ चित्रपटाचा ट्रेलर चाहत्यांना खूप आवडला आहे. ट्रेलरमध्ये केवळ रणवीर सिंगच्या अभिनयानेच एकदा कौतुक होत नाहीये, तर चित्रपटाची कथा आणि संदेशही मजबूत आहे. हा चित्रपट पुढील महिन्यात प्रदर्शित होणार आहे. अशा परिस्थितीत या चित्रपटाची स्टारकास्ट चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. दरम्यान, रणवीर सिंग या चित्रपटाचे प्रमोशन करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये रणवीर सिंग प्रमोशनदरम्यान असे कृत्य करताना दिसला की, व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमचेही डोके चक्रावेल.

घातले अतरंगी कपडे
या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की रणवीर सिंग नेहमीप्रमाणेच त्याच्या विचित्र ड्रेसिंग सेन्समध्ये दिसत आहे. प्रमोशन दरम्यान अभिनेत्याने पांढरा फ्लॉवर प्रिंट शर्ट परिधान केलेला दिसला. ज्याची बटणे समोरून उघडी आहेत. यासोबत त्याने रंगबिरंगी सैल पायजमा आणि पिवळे शूज घातले होते. (ranveer singh doing awkward thing while doing film promotion see shocking video)

कारवर बसून दिल्या पोझ
कारमधून खाली उतरताच रणवीर सिंग खूप आनंदी दिसत होता. यानंतर त्याने गाडीजवळ उभ्या असलेल्या सर्वांना हाताने इशारा करून थोडे दूर जाण्यास सांगितले. यानंतर अभिनेता गाडीच्या बोनेटवर बसला आणि पोझ देऊ लागला.

केला डान्स
यानंतर रणवीर सिंगने कारमधून खाली उतरून विचित्र डान्स केला आणि त्याच्या चित्रपटातील गाण्याचे हुक स्टेप केले. हे पाहून आजूबाजूचे लोकही आश्चर्यचकित झाले.

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

१३ मेला रिलीझ होणार चित्रपट
‘जयेशभाई जोरदार’ या चित्रपटात रणवीरसोबत शालिनी पांडे, बोमन इराणी (Boman Irani) आणि रत्ना पाठक (Ratna Pathak) मुख्य भूमिकेत आहेत. यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली बनलेला हा सिनेमा दिव्यांग ठक्करने दिग्दर्शित केला आहे. दिव्यांगचा दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच चित्रपट आहे. निर्माता आदित्य चोप्राचा हा चित्रपट यावर्षी १३ मे रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

Latest Post